सरसंघचालक मोहन भागवतांचं हिंदूंना आवाहन; म्हणाले, “स्वत:च्या सुरक्षेसाठी…”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राजस्थानच्या बारन नगरमधील कृषी उत्पन्न बाजारपेठेत कार्यक्रमात हिंदू समाजाची व्याख्या करताना 'भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे' असे म्हटले. त्यांनी हिंदू समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले आणि आरएसएसच्या कार्याची तुलना जगात कोणाशीही होऊ शकत नाही असे नमूद केले. त्यांनी हिंदू समाजाला भाषा, जात, प्रांताच्या मतभेदांवर मात करून एकत्र येण्याचे आवाहन केले.