“आजकाल तर हसण्याच्या अधिकारावरही संकट घोंघावतंय, किमान..”, : माजी सरन्यायाधीश एस मुरलीधर
ज्येष्ठ वकील आणि ओडिशा उच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश डॉ. एस. मुरलीधर यांनी हसण्याच्या मूलभूत अधिकारावर बंधनं असल्याचं म्हटलं आहे. कुणाल कामरा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं. मुरलीधर यांनी बुलडोझर न्यायावरही टीका केली, आरोपींची घरं पाडणं हा न्याय नाही असं सांगितलं. त्यांनी कायद्यातील बदलांबाबतही भाष्य केलं. Live Law ने हे वृत्त दिलं आहे.