“आम्ही कुणालाही लग्न करायला..”, जग्गी वासुदेव यांच्या ‘इशा फाऊंडेशन’चं स्पष्टीकरण!
सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या 'इशा फाऊंडेशन'विरोधात माजी प्राध्यापक एस. कामराज यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या मुलींना ब्रेनवॉशिंग करून संन्यासी जीवन जगण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. न्यायालयात सुनावणी सुरू असून, इशा फाऊंडेशनने हे आरोप फेटाळले आहेत. फाऊंडेशनने स्पष्ट केले की, अध्यात्म व योगाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी त्यांची स्थापना झाली असून, संन्यास घेणे ही वैयक्तिक निवड आहे.