बांगलादेशातील प्रसिद्ध टीव्ही अँकरचा मृतदेह तलावात आढळल्याने खळबळ
बांगलादेशातील प्रसिद्ध टीव्ही पत्रकार साराह रहनुमाचा मृतदेह ढाका येथील तलावात आढळला आहे. गाझी टीव्हीची न्यूज एडिटर आणि अँकर असलेल्या साराहच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. तिच्या मृत्यूच्या काही तास आधी तिने फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहिली होती. शेख हसीना यांच्या मुलाने हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला असल्याचे म्हटले आहे.