पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा होताच, स्थलांतरितांना आणणारी दोन विमाने अमृतसरला उतरणार
भारतातून अवैधपणे अमेरिकेत गेलेल्या स्थलांतरितांना परत आणणारे दुसरे विमान १५ फेब्रुवारीला अमृतसर विमानतळावर उतरणार आहे. या विमानात ११९ भारतीय नागरिक आहेत, ज्यात ६७ पंजाबचे आहेत. तिसरे विमान १६ फेब्रुवारीला येणार आहे. पहिल्या विमानातील नागरिकांना बेड्या घातल्यामुळे टीका झाली होती. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत अवैध स्थलांतरावर चर्चा केली होती.