“आपण ‘एक व्यक्ती एक कुटुंब’ व्यवस्थेच्या उंबरठ्यावर आहोत”, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी!
सर्वोच्च न्यायालयाने वृद्ध नागरिक कायदा २००७ अंतर्गत एका वृद्ध महिलेनं मुलाला घराबाहेर काढण्याची याचिका फेटाळली. न्यायालयाने नमूद केलं की, कायद्यात मुलांना घराबाहेर काढण्याची तरतूद नाही. अपवादात्मक स्थितीतच असे आदेश दिले जाऊ शकतात. न्यायालयाने कौटुंबिक कलहाबद्दल चिंता व्यक्त केली आणि 'वसुधैव कुटुंबक' तत्वावर विश्वास ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.