शरद पवारांनी सांगितला किस्सा, “मला ते एक मत मिळालं आणि वाजपेयींचं सरकार पडलं”
१९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडलं होतं, हे मत शरद पवारांनी मिळवलं होतं. त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून अविश्वास ठराव मांडला होता. शरद पवारांनी गुरुवारी दिल्लीतील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात हा किस्सा सांगितला. शिवसेनेच्या नाराजीबाबत त्यांनी संजय राऊतांशी मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं. बाळासाहेब ठाकरेंबरोबरच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.