काँग्रेसमधल्या अंतर्गत कलहांबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले, “माझ्याच पक्षातले लोक मला…”
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरुर सध्या चर्चेत आहेत. काँग्रेसमधील मतभेदांमुळे ते पक्ष सोडतील अशी चर्चा आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत थरुर यांनी आपली उदारमतवादी भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसमधील कलहांबाबत ते म्हणाले की, पक्षातील काही लोक त्यांच्यावर टीका करतात, पण त्यांनी काँग्रेस सोडलेली नाही. मोदी सरकारचे कौतुक करताना त्यांनी आपली मते स्पष्टपणे मांडली.