बिलावल भुट्टोंना शशी थरुर यांचं जोरदार प्रत्युत्तर; “सिंधु नदीत रक्ताचे पाट वाहिले तर..”
काँग्रेस नेते शशी थरुर यांनी बिलावल भुट्टोंच्या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भुट्टोंनी सिंधू करार रद्द केल्यास रक्ताचे पाट वाहतील असं म्हटलं होतं. थरुर यांनी पाकिस्तानला इशारा दिला की, रक्ताचे पाट वाहिले तर त्यात पाकिस्तान्यांचं रक्त जास्त असेल. पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसतो हे जगाला माहीत आहे. भारताने अजून मोठं नुकसान केलं नाही, पण पाकिस्तानने कुरापती थांबवल्या नाहीत तर आम्हीही तसंच उत्तर देऊ, असं थरुर म्हणाले.