१४ वर्षीय मुलीचा बालविवाह! सासरी नांदण्यास नकार दिल्यावर नवऱ्याने खेचत घरी नेलं
बंगळुरुतील कर्नाटक येथील दुर्गम गावात १४ वर्षीय मुलीचं २९ वर्षीय तरुणाशी बालविवाह लावण्यात आलं. मुलीने या लग्नाला नकार दिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. तिच्या आईनेच या लग्नासाठी पुढाकार घेतला होता. मुलगी माहेरी परतल्यानंतर तिचा नवरा तिला जबरदस्तीने घेऊन गेला. प्रत्यक्षदर्शींनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपींना अटक केली.