देशातील प्रसिद्ध उद्योगपतीची नातवाकडून हत्या; आजोबांना ७३ वेळा चाकूने भोसकले!
हैदराबादच्या सोमाजीगुडा येथे मालमत्तेच्या वाटपावरून झालेल्या वादातून वेलजन ग्रुपचे उद्योगपती जनार्दन राव यांची त्यांच्या नातवाने, कीर्ती तेजसने, चाकूने हत्या केली. ८६ वर्षीय राव यांच्यावर ७० हून अधिक वेळा वार करण्यात आले. या घटनेत तेजची आईही जखमी झाली. तेज अमेरिकेतून परतल्यानंतर मालमत्तेच्या वाटपावरून वाद झाला. पोलिसांनी तेजला ताब्यात घेतलं आहे.