चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला भररस्त्यात बेदम मारले
कर्नाटकातील दावणगेरे येथे एका महिलेच्या घरी दोन नातेवाईक आल्याने तिच्या नवऱ्याने चारित्र्याच्या संशयावरून तिला हातोडा आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना व्हायरल व्हिडिओमध्ये कैद झाली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर चन्नागिरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक केली. या प्रकरणी जलदगतीने कारवाई करत विशेष पथक तयार करण्यात आले.