हेडफोन आणि मोबाइल ठरलं मृत्यूचं कारण; रेल्वे ट्रॅकवर बसलेला विद्यार्थी ट्रेनखाली चिरडला
हेडफोन आणि मोबाइलचा अतिवापर विद्यार्थ्यांसाठी घातक ठरत आहे. भोपाळमध्ये २० वर्षीय विद्यार्थी मानराज तोमर रेल्वे रुळावर मोबाइलवर व्हिडीओ पाहताना ट्रेनखाली चिरडला गेला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हेडफोनमुळे ट्रेनचा आवाज ऐकू आला नाही. मानराज बीबीएचा विद्यार्थी होता आणि त्याला बॉडी बिल्डिंग व रिल बनविण्याचा छंद होता.