सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या, पण शारिरीक नुकसानाचं काय? ४५ दिवस रिहॅबिलिटेशनमध्ये…
नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे ८ दिवसांच्या अंतराळ मोहिमेनंतर तांत्रिक अडचणींमुळे २८६ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकले होते. अखेर ते पृथ्वीवर परतले आहेत. परंतु, त्यांच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी त्यांना ४५ दिवसांच्या 'अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम'मध्ये राहावे लागणार आहे. या काळात त्यांना पृथ्वीच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार केले जातील.