सुनीता विल्यम्स यांच्या भारतातील गावी जल्लोष; त्यांच्या सुरक्षित परतीसाठी केला होता यज्ञ!
नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर २८६ दिवसांनंतर पृथ्वीवर परतले. तांत्रिक अडचणींमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहावे लागले. बुधवारी पहाटे SpaceX Crew Dragon Capsule अमेरिकन सागरात उतरली. सुनीता विल्यम्स यांच्या गुजरातच्या झुलासन गावात जल्लोष करण्यात आला. त्यांच्या सुरक्षित परतीसाठी गावकऱ्यांनी प्रार्थना केली होती. परतल्यानंतर त्यांना ४५ दिवसांच्या रिहॅबिलिटेशनमध्ये राहावे लागणार आहे.