कोलकाता प्रकरणातील आरोपी संजय रॉयला हवं चाओमिन, तुरुंगातली पोळी-भाजी पाहून संताप
कोलकाता येथील आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयात ९ ऑगस्टला एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली असून, प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे. तुरुंगात संजय रॉयने पोळी-भाजीवर नाराजी व्यक्त करून चाओमिन आणि अंडी मागितली आहेत अशी माहिती मिळते आहे.