सर्वोच्च न्यायालयाचं यूट्यूब चॅनल हॅक? कोलकाता बलात्कारसह महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी!
शुक्रवारी दुपारी सर्वोच्च न्यायालयाच्या यूट्यूब चॅनलवर अचानक सलग जाहिराती चालू झाल्या आणि काही युजर्सना दुसऱ्या चॅनलवर वळवलं गेलं. हॅकिंगची शक्यता वर्तवली जात आहे. रिपल लॅब कंपनीची जाहिरात हॅक करून दाखवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या व्हिडीओज प्रायव्हेट करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आयटी विभागाने आणि एनआयसीने याबाबत काम सुरू केलं आहे.