व्यंगात्मक विनोदामुळे आयुष्य अर्थपूर्ण होतं-सुप्रीम कोर्ट; प्रतापगढींविरोधातील FIR रद्द!
गेल्या काही दिवसांपासून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. एकनाथ शिंदे व शिवसेनेचा उल्लेख 'गद्दार' करत कामराने व्यंग केलं होतं, ज्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. न्यायालयाने इम्रान प्रतापगढी प्रकरणातही अशाच प्रकारच्या व्यंगात्मक विनोदावर भाष्य केलं आहे.