‘बुलडोझर कारवाई’बाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; प्रक्रियेवरच उपस्थित केलं प्रश्नचिन्ह!
सर्वोच्च न्यायालयाने 'बुलडोझर कारवाई' प्रकरणात निकाल दिला आहे. न्यायालयाने गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तीच्या घरावर बुलडोझर कारवाई करणं घटनाविरोधी असल्याचं स्पष्ट केलं. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने प्रशासनाच्या मनमानी कारभारावर वचक बसवण्यासाठी नियमावली जारी केली. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील अशा कारवायांमुळे तणाव निर्माण झाला होता, ज्यावर न्यायालयाने निर्देश दिले आहेत.