“लवकरात लवकर मुलांना जन्माला घाला”, तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे दाम्प्त्यांना आवाहन
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी नागरिकांना तत्काळ मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलं आहे. लोकसंख्या आधारित सीमांकनामुळे संसदेत तामिळनाडूचे सदस्य कमी होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. कुटुंब नियोजन धोरणांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे राज्याचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. ५ मार्च रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावून त्यांनी तामिळनाडूच्या भविष्याचा विचार करण्याचे आवाहन केले आहे.