तेलंगणामध्ये सर्व शाळांना तेलुगू भाषा सक्तीची; शासन निर्णय काढून सर्व बोर्डांना दिले आदेश!
तेलंगणा सरकारने सर्व शाळांमध्ये तेलुगू भाषा सक्तीची केली आहे. हा निर्णय २०२५-२६ पासून नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि २०२६-२७ पासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू होईल. सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी बोर्डांच्या शाळांनाही हा आदेश लागू आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेची ओळख होईल. तेलुगू अभिजात भाषा समितीच्या शिफारशींनुसार हा निर्णय घेतला गेला आहे.