“वाहेगुरू चमत्कार करतील अन्…”, बोगद्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या परतीची कुटुंबियांना आस
तेलंगणातील श्रीशैलम डावा किनारा कालवा प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या आठ मजुरांच्या सुटकेची आशा धूसर झाली आहे. अडकलेले मजूर त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावते होते. गुरप्रीत सिंग, संदीप साहू, संतोष साहू यांचे कुटुंबीय त्यांच्या परतीची वाट पाहत आहेत. कुटुंबीयांनी देवाकडे चमत्काराची प्रार्थना केली आहे. सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.