मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य
अयोध्येत राम मंदिर उभारल्यानंतर देशभरात आनंद व्यक्त झाला, परंतु काशी, मथुरा आणि संभलमधील वाद सुरू झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या वादांवर नाराजी व्यक्त केली असताना, संघाशी संबंधित 'दी ऑर्गनायझर' नियतकालिकाने वादग्रस्त धार्मिक स्थळांचे सत्य समोर येणे आवश्यक असल्याचे मत मांडले. 'दी ऑर्गनायझर'ने मुस्लिम समाजाने ऐतिहासिक सत्य स्वीकारावे, असे आवाहन केले आहे.