Video: ‘ठुमका लाव नाहीतर निलंबित करतो’, तेजप्रताप यादव यांची होळीच्या दिवशी पोलिसाला धमकी
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेज प्रताप यादव यांनी धुलिवंदन सण साजरा करताना कार्यकर्त्यांचे कपडे फाडून रंग उधळले आणि पोलिसाला नाचण्यास भाग पाडले. या कृत्यांवर भाजपाने टीका केली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जनता दल युनायटेड आणि भाजपाने यादव यांच्यावर टीका करताना बिहारमध्ये जंगलराज असल्याचे म्हटले आहे.