“सनातन धर्म रक्षण मंडळ’ स्थापन करण्याची वेळ आलीय”, उपमुख्यमंत्र्यांची मागणी
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सनातन धर्म संरक्षण मंडळ स्थापन करण्याचे आवाहन केले आहे. लॅबच्या रिपोर्टनुसार, लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि फिश ऑईलचे अंश आढळले आहेत. या प्रकरणावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.