“तू है क्या चीज? बाहर मिल…”, विरोधात निकाल दिल्याने आरोपीची थेट महिला न्यायाधीशांना धमकी
दिल्लीतील न्यायालयात चेक बाऊन्स प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपी आणि त्याच्या वकिलाने महिला न्यायाधीश शिवांगी मंगला यांना धमकावले. आरोपीने न्यायाधीशांवर वस्तू फेकण्याचा प्रयत्न केला आणि वकिलाला निकाल आपल्या बाजूने करण्याचे आदेश दिले. न्यायाधीशांनी आरोपीला दोषी ठरवले होते. या घटनेमुळे न्यायाधीशांना मानसिक आणि शारीरिक त्रास झाला. आरोपीच्या वकिलाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.