‘पत्नीच्या संमतीशिवाय ठेवलेले अनैसर्गिक लैंगिक संबंध गुन्हा नाही’, उच्च न्यायालयाचा निर्णय
छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, पतीने प्रौढ पत्नीशी तिच्या संमतीशिवाय ठेवलेले लैंगिक संबंध अनैसर्गिक असले तरी, गुन्हा मानला जाणार नाही. जगदलपूर येथील आरोपीला बलात्कार आणि इतर आरोपांखाली अटक करण्यात आली होती. २०१७ साली बस्तर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले होते.