“परिस्थिती नियंत्रणात, पण…”, चेंगराचेंगरीनंतर प्रयागराजमध्ये नेमकी स्थिती काय?
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त संगम घाटावर चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अनेक भाविक जखमी झाले असून मृत्यूची शक्यता आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी घटनेची माहिती घेतली आहे. भाविकांना संयमाने वागण्याचे आवाहन करण्यात आले आहे.