उत्तर प्रदेशात चुलत भावाबहिणीने केलं लग्न;कुटुंबाच्या भीतीने महिन्याभरात दोघांची आत्महत्या
उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एका जोडप्यानं आत्महत्या केली. पती-पत्नी चुलत भाऊ-बहीण होते आणि कुटुंबीयांच्या विरोधामुळे पळून जाऊन लग्न केले होते. कुटुंबीयांच्या धमक्यांमुळे त्यांनी आत्महत्या केली. तीन पानांच्या सुसाईड नोटमध्ये कुटुंबीयांच्या भीतीने आत्महत्या केल्याचे नमूद आहे. दोघे शास्त्रीनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. उत्तर प्रदेशात ऑनर किलिंगचा आणखी एक प्रकार जौनमना गावात घडला आहे.