अमेरिकेत तेलुगू डोनेशन स्कॅमची चर्चा, खासगी कंपनीनं ७०० कर्मचाऱ्यांची केली हकालपट्टी!
अमेरिकेतील Fannie Mae कंपनीने ७०० कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावरून निलंबित केलेल्यांमध्ये तेलुगु कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. 'मॅचिंग ग्रँट्स प्रोग्राम' अंतर्गत निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. TANA संस्थेशी हातमिळवणी करून कोट्यवधी डॉलर्सचा गैरवापर झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी अॅपल कंपनीतही अशा प्रकारचा घोटाळा उघड झाला होता.