तहव्वूर राणाला अमेरिकेच्या कोर्टाचा पुन्हा धक्का; प्रत्यार्पण स्थगितीचा अर्ज फेटाळला!
२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वुर राणा याला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची विनंती फेटाळली आहे, ज्यामुळे राणाला भारतात परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राणाने न्यायालयात आपत्कालीन अर्ज दाखल केला होता, परंतु तो नाकारण्यात आला. भारत गेल्या अनेक वर्षांपासून राणाच्या प्रत्यार्पणासाठी आग्रही आहे.