महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया…
मौनी अमावस्येनिमित्त संगम घाटावर शाही स्नानासाठी जमलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली, ज्यात अनेकजण जखमी झाले आणि मृत्यूची शक्यता आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना गंगा नदीच्या जवळच्या घाटावरच स्नान करण्याचे आणि संगम घाटाजवळ येण्याचा प्रयत्न न करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचेही आवाहन केले आहे.