मोदींनी फोन केला होता, पण विनेशनं बोलण्यास नकार दिला; म्हणाली, “त्यांची अट होती की…”
नुकत्याच पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवलेल्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी संवाद साधला. मात्र, विनेश फोगटने अपात्र ठरल्यानंतर मोदींशी बोलण्यास नकार दिला. विनेशने सांगितले की, मोदींनी संवादाच्या अटी ठेवल्या होत्या, ज्यात व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा समावेश होता. विनेशने या अटींना विरोध केला आणि आपल्या भावनांची चेष्टा होऊ नये असं वाटलं म्हणून बोलण्यास नकार दिला.