‘ऑफिस ब्रेकदरम्यान सेक्स करा’, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे जन्मदर वाढवण्यासाठी फर्मान
रशियाचा जन्म दर घसरत असल्याने राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी नागरिकांना जेवणाच्या सुट्टीदरम्यान सेक्स करून जन्म दर वाढवण्याचे आवाहन केले आहे. सध्या रशियामध्ये सरासरी प्रजनन दर प्रति महिला १.५ मुले आहे, जो २.५ असायला हवा. रशियाची लोकसंख्या २०५० पर्यंत १३० दशलक्षांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची कमतरता आणि लष्कराची क्षमता वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.