दुसऱ्या फेरीतही अवैध स्थलांतरितांना लष्करी विमानातून बेड्या घालून आणले; प्रवाशांचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यानंतर ११९ अवैध भारतीय स्थलांतरितांना अमृतसरमध्ये परत पाठवण्यात आले. ५ फेब्रुवारीला पहिले विमान आले होते, तर १५ फेब्रुवारीला दुसरे विमान आले. या स्थलांतरितांमध्ये पंजाब, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, गोवा, महाराष्ट्र, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील लोकांचा समावेश आहे.