आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक कसं आहे?
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे पृथ्वीभोवती फिरणारं एक मोठं अंतराळयान आहे. येथे अंतराळवीर राहतात आणि विज्ञानातील नवनवे प्रयोग करतात. भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स येथे ९ महिने राहिली आहे. हे स्थानक पृथ्वीपासून सुमारे ४०३ किलोमीटर उंचीवर आहे आणि १७,५०० मैल प्रतितास वेगाने प्रवास करते. १९९८ मध्ये याचा पहिला भाग प्रक्षेपित झाला आणि २०११ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. हे स्थानक पाच बेडरूमच्या घराइतके मोठे आहे.