आतिशी नावापुढे आडनाव का लावत नाहीत? काय घडलं होतं २०१८ मध्ये? वाचा काय आहे पूर्ण नाव…
अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी आतिशी यांची निवड करण्यात आली. त्यामुळे शीला दीक्षित यांच्यानंतर दिल्लीला पहिली महिला मुख्यमंत्री मिळाली. आतिशी यांचं पूर्ण नाव आतिशी मार्लेना सिंग आहे, पण त्या फक्त 'आतिशी' नाव वापरतात. २०१८ मध्ये भाजपाच्या प्रचारामुळे त्यांनी 'मार्लेना' नाव काढलं असं सांगितलं जातं. त्यांच्या आई-वडिलांनी कार्ल मार्क्स आणि व्लादिमीर लेनिन यांच्या नावांवरून 'मार्लेना' ठेवलं होतं.