अरविंद केजरीवाल राजीनामा देणार; आता राजधानीची सूत्रं कुणाच्या हाती?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. त्यांच्या जागी कोण येणार याची चर्चा सुरू आहे. आम आदमी पक्षातील मंत्री अतिषी, गोपाल राय आणि कैलाश गहलोत यांची नावे चर्चेत आहेत. केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत प्रकल्प रखडले आहेत, त्यामुळे नवीन मुख्यमंत्री लवकरच नेमण्याची गरज आहे. मनीष सिसोदिया यांनी मात्र चर्चेतून माघार घेतली आहे.