वंदे भारत एक्सप्रेसचा वेग कमी का केला? रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले…
वंदे भारत एक्सप्रेसने देशातील रेल्वे प्रवासात नवे युग सुरू केले आहे. चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत तयार झालेली ही ट्रेन ताशी १६० किमी वेगाने धावण्यासाठी सक्षम आहे. मात्र, तिचा वेग कमी असल्याची तक्रार खासदारांनी केली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वेग कमी होण्याचे कारण सांगितले.