प्रदूषणामुळे भारतीयांचं आयुष्य ५ वर्षांनी घटलं, दिल्ली सर्वात प्रदूषित, भिवंडीही यादीत!
जागतिक हवा गुणवत्ता अहवालानुसार, दिल्ली सलग सहा वर्षे जगातील सर्वात प्रदूषित राजधानी ठरली आहे. भारतातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी १३ शहरं भारतात आहेत, ज्यात मेघालयमधील बिरनिहाट पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील लोणी आणि भिवंडी यांचा देखील समावेश आहे. वाढत्या प्रदूषणामुळे भारतीयांचं सरासरी आयुष्यमान ५.२ वर्षांनी घटलं आहे. अहवाल १३८ देशांतील ४० हजार एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशनच्या माहितीवर आधारित आहे.