महाकुंभ: एका कुटुंबानं बोटींच्या फेऱ्यांमधून कमावले तब्बल ३० कोटी! योगी आदित्यनाथांचा दावा
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याची सांगता झाली. कोट्यवधी भाविकांनी गंगा, यमुना, सरस्वती नद्यांच्या संगमावर स्नान केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधिमंडळात महाकुंभमेळ्यातील आर्थिक व्यवहारांची आकडेवारी सादर केली. माहरा कुटुंबाने ४५ दिवसांत ३० कोटींची कमाई केली. विरोधकांनी नावाड्यांच्या आर्थिक शोषणाचा आरोप केला. योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभमेळ्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याचा दावा केला.