दिवाळीच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Diwali 2024 Gold Silver Rate Today : दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आज सोन्याच्या दरात आज किंचित घसरण झाली आहे. आदल्या दिवशीच्या तुलनेत आज २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १३० रुपयांची घसरण झाली आहे. इतकच नाही तर चांदीचा दरही ६७० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर सोने- चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घ्या.