देशाचे सर्वात काळासाठीचे सरन्यायाधीश कोण होते माहितीये? फक्त १७ दिवस राहिले पदावर!
माजी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली. त्यांनी ११ नोव्हेंबर २०२४ रोजी शपथ घेतली, परंतु त्यांचा कार्यकाळ फक्त सहा महिन्यांचा असेल. भारतात सरन्यायाधीशपदाचा सर्वात कमी कार्यकाळ १७ दिवसांचा होता, जो न्यायमूर्ती कमल नरेन सिंग यांचा होता. निवृत्तीचं वय आणि अंतरिम स्वरूपाच्या नियुक्त्या यामुळे काही न्यायमूर्तींचा कार्यकाळ अल्पावधीत संपला आहे.