निवडणूक काळात नेते आणि स्टार प्रचारकांच्या बॅगा का तपासल्या जातात?
निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात विविध नेत्यांच्या बॅगा तपासण्यावरून वाद निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या आवाज उठवल्यानंतर अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार, फ्लाईंग स्क्वाड टीम (एफएसटी) आणि स्टॅटीक सर्विलन्स टीम (एसएसटी) या पथकांकडून बॅगा तपासल्या जातात. विरोधकांचा दावा आहे की त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय, परंतु निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय नेत्यांच्या बॅगा तपासल्या जात असल्याचे स्पष्ट केले आहे.