मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा, आता मंत्रिपदाकडे लक्ष; आदिती तटकरे म्हणाल्या…
राज्यात सत्तास्थापनेचा पेच एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत सोडवला. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय मान्य असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांनी महायुतीच्या नेत्यांनी एकत्र येऊन काम केल्याचे आणि जनतेने त्यांना भरभरून प्रेम दिल्याचे सांगितले. मुख्यमंत्री पदाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. मागील मंत्रिमंडळात महिला आणि बालविकास मंत्रालय सांभाळणाऱ्या तटकरे यांनी वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे नमूद केले.