ajit pawar on cm post
1 / 30

अजित पवार म्हणाले, “धरसोड केली तर तुमची विश्वासार्हता राहात नाही”; मुख्यमंत्रीपदाबाबतही…

गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, आता त्यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्रीपद गौण असून महायुतीचं सरकार निवडून आणणं हे मुख्य लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं. ९० जागा मिळाल्या नसल्याने त्यांनी तडजोडीची तयारी दर्शवली आहे. धरसोड केल्यास विश्वासार्हता कमी होते, असंही त्यांनी नमूद केलं.

Swipe up for next shorts
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
2 / 30

राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका, “बाळासाहेब म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस..”

विधानसभा निवडणूक जवळ आली असून २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान होणार आहे आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचा सामना रंगणार आहे. मनसेनेही उमेदवार उतरवले आहेत. राज ठाकरे जोरदार प्रचारसभांमध्ये उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याचा आधार घेत उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते शिवसेनेची काँग्रेस होतना दिसली तर दुकान बंद करेन. आज त्यांचे चिरंजीव हाताच्या पंजाचा प्रचार करत आहेत. ही बाब दुर्दैवी आहे असंही राज ठाकरे म्हणाले.

Swipe up for next shorts
ajit pawar on sharad pawar (1)
3 / 30

“मी आता काय करायचं हे शरद पवारांनी सांगावं”, अजित पवारांनी मांडलं ६० वर्षांचं गणित!

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडली आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) सत्ताधारी तर शिवसेना (उद्धव ठाकरे) विरोधी गटात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सत्ताधारी तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) विरोधी गटात आहे. बारामतीत शरद पवारांनी अजित पवारांवर टीका केली, त्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं.

Swipe up for next shorts
biggest Flop bollywood Movie of 2024
4 / 30

२०२४ चा सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा; बॉलीवूडकरांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट, कमावले फक्त..

दरवर्षी भारतात अनेक चित्रपटांची निर्मिती होते, त्यापैकी काही हिट होतात तर काही फ्लॉप. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट मोठ्या बजेट आणि तगडी स्टारकास्ट असूनही फ्लॉप ठरला. अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, पृथ्वीराज सुकुमारन, मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा यांसारख्या कलाकारांचा समावेश असलेल्या या चित्रपटाने फक्त ६५.९६ कोटी रुपये कमावले. ३५० कोटींच्या बजेटमुळे निर्मात्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.

Rupali Bhosle will missing milind gawali after off air aai kuthe kay karte serial
5 / 30

‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे सध्या मालिकेतील कलाकार मंडळी व्यक्त होताना दिसत आहेत. ‘आई कुठे काय कर’ते मालिका संपल्यानंतर संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसलेला कोणाची आठवण येईल? जाणून घ्या…

actress Athiya Shetty announces pregnancy
6 / 30

अथिया शेट्टी-केएल राहुल होणार आई-बाबा; अभिनेत्रीने पोस्ट करून दिली आनंदाची बातमी

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल लवकरच आई-बाबा होणार आहेत. अथियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी २३ जानेवारी २०२३ रोजी लग्न केले होते. अथिया २०२५ मध्ये आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील कलाकारांनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.

Vijay Deverakonda fell down the stairs video goes viral on social media
7 / 30

Video: जिना उतरताना जोरात पडला विजय देवरकोंडा, व्हिडीओ होतोय व्हायरल

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा सध्या त्याच्या आगामी म्युझिक व्हिडीओमुळे चर्चेत आहे. ‘साहिबा’ असं त्याच्या म्युझिक व्हिडीओचं नाव आहे. काही तासांपूर्वीच या म्युझिक व्हिडीओचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये विजय देवरकोंडसह अभिनेत्री राधिका मदान पाहायला मिळाली. अशातच दुसऱ्या बाजूला जिना उतरताना विजय देवरकोंडा जोरात पडल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

India highest grossing movie in china Secret Superstar
8 / 30

अवघ्या १६ वर्षांच्या अभिनेत्रीची मुख्य भूमिका, १५ कोटींचे बजेट अन् कमावलेले तब्बल ९०५ कोटी

अद्वैत चंदन दिग्दर्शित 'सिक्रेट सुपरस्टार' या २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने चीनमध्ये कमाईचे रेकॉर्ड मोडले. फक्त १५ कोटी रुपयांच्या बजेटवर बनलेल्या या चित्रपटाने चीनमध्ये ७५० कोटी रुपये कमावले. झायरा वसीमने मुख्य भूमिका साकारली होती. तिच्या 'दंगल' आणि 'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटांनी एकूण ३००० कोटी रुपयांची कमाई केली. झायराने १८ व्या वर्षी इस्लामसाठी बॉलीवूड सोडले.

Bigg Boss 18 hrithik roshan life coach arfeen khan Evicted from salman khan
9 / 30

हृतिक रोशनच्या लाइफ कोचला दाखवला ‘बिग बॉस १८’च्या घराबाहेरचा रस्ता

'बिग बॉस १८'च्या घरात नुकताच टाइम गॉड टास्क पार पडला. यात सारा अरफीन खान बाद झाली आणि तिने गोंधळ घातला. त्याआधी विवियन डिसेनाने पक्षपातीपणे आठ सदस्यांना नॉमिनेट केले. मात्र, चार सदस्यांना सुरक्षित करण्याचा अधिकार घरातील सदस्यांना दिला गेला. त्यामुळे चाहत पांडे, सारा अरफीन खान, अरफीन खान, तजिंदर बग्गा नॉमिनेट झाले. यातून एक सदस्य घराबाहेर झाल्याचं समोर आलं आहे.

actress sreejita de and michael bengali wedding
10 / 30

दीड वर्षांपूर्वी जर्मन तरुणाशी बांधली लग्नगाठ, Bigg Boss फेम अभिनेत्री पुन्हा करतेय लग्न

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १६’ची स्पर्धक श्रीजिता डे तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने ३० जून २०२३ रोजी बॉयफ्रेंड मायकल ब्लोम-पेपशी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं. आता ती बंगाली पद्धतीने पुन्हा लग्न करणार आहे. १० नोव्हेंबरला लग्न, मेहंदी, संगीत, हळदी आणि रिसेप्शनचे कार्यक्रम होणार आहेत. श्रीजिता व मायकल २०१९ पासून एकमेकांना डेट करत आहेत.

himachal pradesh cm sukhvinder singh sukhu
11 / 30

मुख्यमंत्र्यांसाठीचे सामोसे खाल्ले कुणी? CID करतेय चौकशी; राज्यभर त्याचीच चर्चा!

हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्यासाठी मागवलेले सामोसे त्यांच्या स्टाफने खाल्ल्याने वाद निर्माण झाला आहे. २१ ऑक्टोबरला सीआयडीच्या कार्यक्रमात हे घडले. CID या प्रकरणाची चौकशी करत आहे, परंतु काँग्रेसने चौकशीचे आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपाकडून वाद उकरला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. CID ने ही अंतर्गत बाब असल्याचे सांगितले आहे.

Deepika Padukone And Ranveer Singh Spotted with baby dua after delivery video viral
12 / 30

पहिल्यांदाच लाडक्या लेकीबरोबर दिसले दीपिका पादुकोण अन् रणवीर सिंह, व्हिडीओ होतोय व्हायरल

काही महिन्यांपूर्वी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दीपिका पादुकोण ( Deepika Padukone ) आणि रणवीर सिंहच्या घरी पाळणा हलला. दोघं पहिल्यांदाच आई-बाबा झाले. ८ सप्टेंबर २०२४ रोजी दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही आनंदाची बातमी तिने सोशल मीडियाद्वारे दिली होती. आज दीपिकाच्या लेकीला दोन महिने पूर्ण झाले आहेत आणि आजच पहिल्यांदा लेकीबरोबर दीपिका आणि रणवीर दिसले आहेत.

Bigg Boss 18 ekta Kapoor slams on Vivian dsena watch promo
13 / 30

एकता कपूरने ‘बिग बॉस’च्या लाडक्या विवियन डिसेनाला चांगलंच झापलं, म्हणाली…

Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील घरात वातावरण सध्या फारच तापलं आहे. दोन ग्रुप पडले आहेत. ज्यामध्ये सातत्याने वाद होतं आहेत. ७ नोव्हेंबरच्या भागात नुसताच राडा पाहायला मिळाला. टाइम गॉडच्या टास्कदरम्यान जोरात वाद झाले. सारा अरफीन खानने विवियन डिसेना, ईशा सिंहवर वस्तू फेकून मारल्या. तर अविनाश मिश्राची थेट कॉलर पकडली. यावेळी विवियनच्या ग्रुपवर टीका करताना साराची जीभ घसरली. नेमकं काय घडलं? आणि एकता कपूर विवियनला काय म्हणाली? जाणून घ्या…

Marathi Actress Shivani Sonar Share Special Post For mother on 50th birthday
14 / 30

“अशीच वेडी राहा…” म्हणत शिवानी सोनारने आईला ५०व्या वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा

‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली संजवनी म्हणजे अभिनेत्री शिवानी सोनार ( Shivani Sonar ) सध्या ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील मालिकेत पाहायला मिळत आहे. ‘सोनी मराठी’वरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत शिवानी अभिनेता सुबोध भावेसह प्रमुख भूमिकेत दिसत आहे. शिवानीच्या इतर भूमिकांप्रमाणे तिची या मालिकेतील तन्वी आणि गौरीची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. अशातच शिवानीने आपल्या आईला ५०व्या वाढदिवसानिमित्ताने हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

L K Advani Birth day Story
15 / 30

लालकृष्ण आडवाणी, टेनिसची मॅच आणि संघाचं सदस्यत्व! काय आहे ‘तो’ रंजक किस्सा?

भारताचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा आज ९७ वा वाढदिवस आहे. भाजपाच्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आडवाणी यांनी भाजपाच्या २ खासदारांपासून ३०३ खासदारांपर्यंतचा प्रवास पाहिला आहे. लालकृष्ण आडवाणी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य कसे झाले? त्याचा किस्साही रंजक आहे.

justin treudeau s jaushankar canada india
16 / 30

भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची प्रतिक्रिया दाखवली म्हणून कॅनडानं वृत्तसंस्थेला केलं ब्लॉक!

गेल्या वर्षी कॅनडामध्ये खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जर याची हत्या झाली. कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर आरोप केल्यामुळे द्वीपक्षीय संबंध बिघडले. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियात पत्रकार परिषदेत कॅनडाच्या आरोपांवर भाष्य केले. 'दी ऑस्ट्रेलिया टुडे' वृत्तसंस्थेने ही परिषद दाखवल्यानंतर कॅनडाने त्यांचे सोशल मीडिया हँडल्स ब्लॉक केले. भारताने या कृतीचा तीव्र निषेध केला आहे.

Sidhu Moosewala baby brother face reveal
17 / 30

सिद्धू मूसेवालाच्या आई-वडिलांनी दाखवला धाकट्या मुलाचा चेहरा, गोंडस शुभदीपचा फोटो Viral

दिवंगत पंजाबी रॅपर सिद्धू मूसवाला यांचे पालक बलकौर सिंग आणि चरण कौर यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले आहे. त्यांनी मुलाचे नाव शुभदीप ठेवले आहे. ७ नोव्हेंबर रोजी सिद्धू मूसेवालाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शुभदीपचा फोटो शेअर केला गेला. फोटोमध्ये शुभदीप वडील बलकौर सिंग यांच्या मांडीवर बसला असून, आई चरण कौर शेजारी आहेत. चाहत्यांनी या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

salman khan lawrence bishnoi
18 / 30

पुन्हा धमकी, पुन्हा बिश्नोई गँग; सलमान खानच्या नावाने मुंबई पोलिसांना आला संदेश!

गेल्या महिन्यात सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. काही धमक्या खोडसाळपणाच्या असल्या तरी मुंबई पोलीस सखोल तपास करत आहेत. नव्याने आलेल्या धमकीमागेही बिश्नोई गँगच असल्याची शक्यता आहे. लॉरेन्स बिश्नोई तुरुंगातून गँग चालवतो, तर त्याचा भाऊ अनमोल अमेरिकेतून गँगच्या कारवाया नियोजित करतो. वरळी पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

actor Nitin Chauhaan dies at 35
19 / 30

‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं ३५ व्या वर्षी निधन, अभिनेत्रीने केलेली पोस्ट चर्चेत

टीव्ही अभिनेता नितीन चौहानचं ३५ व्या वर्षी निधन झालं आहे. त्याच्या आकस्मिक निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेत्री विभूती ठाकूरने इन्स्टाग्रामवर नितीनच्या निधनाची माहिती दिली. नितीन 'क्राइम पेट्रोल' आणि 'स्प्लिट्सविला' सारख्या शोमध्ये ओळखला जायचा. त्याच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट असलं तरी आत्महत्येची शक्यता वर्तवली जात आहे. नितीनचे वडील त्याचे पार्थिव अलिगढला घेऊन जाणार आहेत.

yek number OTT release update
20 / 30

‘येक नंबर’ घरबसल्या पाहता येणार, कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय चित्रपट? वाचा

ओटीटी November 7, 2024

‘येक नंबर’ हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि आता ८ नोव्हेंबरपासून झी 5 वर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटात धैर्य घोलप व सायली पाटील यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. प्रेम व राजकीय महत्त्वाकांक्षेचे कथानक असलेल्या या चित्रपटाची निर्मिती तेजस्विनी पंडित व वरदा नाडियादवाला यांनी केली आहे.

Richa Chadha And Ali Fazal Daughter Name is Zuneyra Ida Fazal
21 / 30

अली फजल-रिचा चड्ढा यांनी मुलीचं नाव केलं जाहीर, अर्थ आहे फारच खास

बॉलीवूड November 7, 2024

बॉलीवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल यांना काही महिन्यांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांनी मुलीचं नाव जुनैरा इदा फजल ठेवलं आहे. जुनैराचा इंग्रजीत 'स्वर्गातील फूल' असा अर्थ आहे. रिचा आणि अलीने जवळपास सात वर्षे डेट केल्यानंतर २०२० मध्ये लग्न केलं होतं. रिचाने १६ जुलै २०२४ रोजी मुलीला जन्म दिला.

Sadabhau Khot and Sharad Pawar
22 / 30

शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून सदभाऊ खोतांनी व्यक्त केली दिलगिरी; पण म्हणाले…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती यांचं जागावाटप स्पष्ट झालं आहे. प्रचाराच्या दरम्यान आरोप-प्रत्यारोप होत आहेत. रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला. टीकेनंतर खोत यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत माफी मागितली आणि त्यांच्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त केली.

Eknath Shinde Shivsena Total Candidate List in Marathi
23 / 30

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ८५ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात; संपूर्ण यादी एका क्लिकवर!

राज्यातील विधानसभा निवडणुकीत २८८ जागांसाठी ४१४० उमेदवार रिंगणात आहेत. ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी ७ हजार ७८ उमेदवार पात्र ठरले. अखेरच्या दिवशी २ हजार ९३८ उमेदवारांनी माघार घेतली. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आता ८५ पैकी किती जागांवर त्यांना विजय मिळतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

salman khan shahrukh khan
24 / 30

सलमानपाठोपाठ शाहरूख खानलाही जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल!

मुंबई November 7, 2024

बॉलिवुड अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आता अभिनेता शाहरूख खानलाही अशीच धमकी आली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपण बिश्नोईचे भाऊ असल्याचं सांगितलं आहे. याआधी सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. पोलीस या धमक्यांचा तपास करत आहेत.

donald trump and stormy daniels
25 / 30

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयुष्यात आलेलं पॉर्नस्टार स्ट्रॉमी डॅनियल्सचं प्रकरण काय होतं?

डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरीस यांच्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी चुरशीची लढत झाली, ज्यात ट्रम्प विजयी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांना अभिनंदन केले. ट्रम्प यांच्या आयुष्यात आलेल्या पॉर्नस्टार स्ट्रॉमी डॅनियल्सच्या प्रकरणाची चर्चा आहे. डॅनियल्सने ट्रम्प यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता, ज्याला ट्रम्प यांनी फेटाळले. तिला गप्प राहण्यासाठी पैसे आणि धमक्या दिल्याचेही तिने सांगितले.

Ekta kapoor on The Sabarmati Report release amid maharashtra assembly election
26 / 30

महाराष्ट्रातील निवडणुका अन् ‘द साबरमती रिपोर्ट’चं प्रदर्शन, निर्माती एकता कपूर म्हणाली…

बॉलीवूड November 7, 2024

'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत पार पडला. निर्माती एकता कपूरने चित्रपटाच्या निर्मितीसाठी कोणाचीही मदत घेतलेली नाही आणि कोणत्याही धर्मावर टिप्पणी करत नसल्याचं स्पष्ट केलं. २००२ साली गोधरामध्ये घडलेल्या घटनांवर आधारित हा चित्रपट आहे. विक्रांत मॅस्सी, राशी खन्ना, रिद्धी डोगरा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Bangladesh Army violence against Hindu
27 / 30

Video: बांगलादेशी सैन्याचे हिंदूंवर अत्याचार; चितगावमध्ये ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?

बांगलादेशच्या चितगाव येथे ५ नोव्हेंबर रोजी एका वादग्रस्त सोशल मिडिया पोस्टमुळे हिंदू समाज आणि इस्लामिक कट्टरपंथी गटात तणाव निर्माण झाला. जमात-ए-इस्लामी संघटनेच्या सदस्याने हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर हिंसाचार उसळला. यानंतर सुरक्षा दलाने हिंदूबहुल हजारी गल्ली येथे अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसलीमा नसरीन यांनी हिंसाचाराचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

Zeenat Aman wanted to end marriage after 1 year
28 / 30

वर्षभरात पतीकडून फसवणूक, तरीही केला १२ वर्षे संसार; झीनत अमान कारण सांगत म्हणाल्या…

बॉलीवूड November 7, 2024

ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी १९८५ मध्ये अभिनेता मजहर खानशी लग्न केलं होतं, पण त्यात अनेक अडचणी आल्या. पहिल्याच वर्षात मजहर फसवणूक करत असल्याचं कळलं, तरीही त्यांनी १२ वर्षे लग्न टिकवलं. मुलांसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले, पण मजहरच्या आजारपणामुळे आणि ड्रग्जच्या व्यसनामुळे शेवटी त्यांना लग्नातून बाहेर पडावं लागलं.

maharashtra assembly election quiz
29 / 30

Election Quiz: नेत्यांप्रमाणे तुम्हालाही आहे जिंकण्याचा विश्वास? द्या फक्त ५ उत्तरं!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महायुतीत आहेत, तर काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) महाविकास आघाडीत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर अपक्षही निवडणुकीत उतरले आहेत. २८८ जागांसाठी हजारो उमेदवार रिंगणात आहेत.

Jammu Kashmir Assembly Chaos
30 / 30

जम्मू काश्मीरच्या विधानसभेत आमदार भिडले; कलम ३७० च्या मुद्द्यावरून सभागृहात घमासान!

जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुनर्संचयित करण्याच्या मागणीवरून खडाजंगी झाली. अपक्ष आमदार शेख खुर्शीद यांनी फलक घेऊन विधानसभेत गोंधळ घातला, ज्यामुळे भाजपा आमदारांनी विरोध केला. दोन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये हातापायी झाली. पीडीपी आणि पिपल्स कॉन्फरन्सने विशेष दर्जा बहाल करण्यासाठी ठराव मांडला. विधानसभेचे अध्यक्ष अब्दुल रहीम राथेर यांनी तीन आमदारांना वेलमधून बाहेर काढले.