amit thackeray vs aadityathackeray maharashtra assembly election
1 / 30

‘राजपुत्रा’ची ‘उद्धवपुत्रा’वर थेट टीका; अमित ठाकरे म्हणाले, “तुम्ही लोकप्रतिनिधी असाल…”

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईतील ३६ मतदारसंघांपैकी अमित ठाकरे विरुद्ध आदित्य ठाकरे ही लढत चर्चेत आहे. अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून तर आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अमित ठाकरेंनी आदित्य ठाकरेंवर वरळीतील विकासकामांवरून टीका केली आहे. तसेच, गेल्या १० वर्षांत पर्यावरण खात्याचं शून्य काम झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Swipe up for next shorts
What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
2 / 30

भाऊबीजेला अजित पवारांची वाट बघणार का? सुप्रिया सुळेंचं उत्तर, “प्रेम असतं तेव्हा…”

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत रंगणार आहे. युगेंद्र पवार यांनी महाविकास आघाडीच्या तिकिटावर अर्ज दाखल केला आहे. सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवारांसोबत अर्ज दाखल करताना बारामतीकरांशी प्रेम आणि विश्वासाचं नातं असल्याचं सांगितलं. अजित पवारांची भाऊबीजेला वाट पाहणार का? हे विचाराल्यावरही सुप्रिया सुळेंनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे.

Swipe up for next shorts
Sharad Pawar and Yugendra Pawar
3 / 30

युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर शरद पवार भावूक प्रतिक्रिया!

महाविकास आघाडीने बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे, ज्यामुळे अजित पवार यांच्या विरोधात काका-पुतण्या लढत पाहायला मिळत आहे. युगेंद्र पवार यांनी बारामती तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला, ज्यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते. शरद पवारांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या तयारीबद्दल माहिती दिली आणि नव्या पिढीच्या उमेदवारांना जनतेशी बांधिलकी ठेवण्याचा सल्ला दिला.

Swipe up for next shorts
Mirzapur The Film announced watch Kaleen bhaiya guddu pandit and munna Tripathi teaser
4 / 30

Video: ओटीटीनंतर मोठ्या पडदा गाजवणार ‘मिर्झापूर’ चित्रपट, लवकरच होणार प्रदर्शित

ओटीटीच्या दुनियेत बहुचर्चित आणि लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या वेब सीरिज पैकी एक म्हणजे 'मिर्झापूर'. या वेब सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन आले. या तिन्ही सीझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. गुड्डू पंडीत आणि कालीन भैय्याच्या मिर्झापूरच्या दुनियेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. त्यामुळे या यशानंतर अ‍ॅमेझॉन एमजीए स्टुडिओ आणि एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रोडक्शनने एक मोठी घोषणा नुकतीच केली आहे. ओटीटीनंतर आता 'मिर्झापूर' मोठा पडदा गाजवणार आहे. म्हणजेच लवकरच 'मिर्झापूर' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

south star was first Indian to charge 1 crore per film
5 / 30

‘हा’ आहे एक कोटी मानधन घेणारा पहिला भारतीय अभिनेता

९० च्या दशकात भारतीय सिनेसृष्टीत एक कोटी रुपये मानधन घेणारे पहिले अभिनेता चिरंजीवी होते. त्यांनी १९९२ मध्ये 'आपडबंधवुडू' सिनेमासाठी १.२५ कोटी रुपये घेतले होते. त्यावेळी अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान यांच्यापैकी कुणीही इतकं मानधन घेतलं नव्हतं. चिरंजीवी यांनी तेलुगू सिनेसृष्टीत अनेक हिट चित्रपट दिले आणि आता ते एका सिनेमासाठी ४० कोटी रुपये मानधन घेतात.

Sanjay Raut and Nana Patole
6 / 30

मविआतील जागा वाटपात ‘टायपिंग मिस्टेक’, संजय राऊत-नाना पटोले यांच्यात पुन्हा खडाजंगी!

महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर केल्यावर दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्यात वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेने अमर पाटील यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसने दिलीप माने यांचे नाव जाहीर केले. संजय राऊतांनी याला टायपिंग मिस्टेक म्हटले, तर नाना पटोले यांनी राऊतांना विरोधकांविरुद्ध लढण्याचा सल्ला दिला.

Bigg Boss 18 salman khan and ajay devgn discussed a past eye injury from action scene in singham again |
7 / 30

‘सिंघम अगेनच्या’मधील एका अ‍ॅक्शन सीनमुळे अजय देवगणला २-३ महिने…, सलमान खान म्हणाला…

Bigg Boss 18: हिंदी 'बिग बॉस'च्या १८व्या पर्वाचा आता चौथा आठवडा सुरू झाला आहे. नुकताच वीकेंड वार पार पडला. या वीकेंड वारमध्ये सलमान खानने अविनाश मिश्राची चांगलीच कानउघडणी केली. त्याबरोबरचं करणवीर मेहरादेखील सुनावलं. रविवारी वीकेंड वारला आगामी चित्रपट 'सिंघम अगेन'चं प्रमोशन करण्यासाठी अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शन रोहित शेट्टीने उपस्थिती लावली होती. यावेळी 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अजय देवगणबरोबर झालेली एक घटना सलमान खानने सांगितली.

What Amit Thackeray Said About Raj Thackeray and Uddhav Thackeray?
8 / 30

“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुळीच एकत्र येऊ नये, कारण..”; अमित ठाकरे काय म्हणाले?

माहीममधून अमित ठाकरे यांना मनसेने उमेदवारी दिली आहे. अमित ठाकरे यांनी माहीममध्ये बदलाची गरज असल्याचे सांगितले आहे. त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊ नये असे मत व्यक्त केले. २०१७ मध्ये शिवसेनेने सहा नगरसेवक फोडल्यामुळे त्यांचा आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद नाही असंही म्हणाले. अमित ठाकरे यांनी आत्मविश्वासाने निवडणूक जिंकण्याची खात्री व्यक्त केली.

Kajol reveals weirdest rumour about her
9 / 30

काजोल प्रवास करत असलेलं विमान क्रॅश झालंय; तिच्या आईला कोणीतरी फोन करून सांगितलं अन्…

बॉलीवूड अभिनेत्री काजोलने 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये तिच्या मृत्यूच्या अफवांबद्दल एक किस्सा सांगितला. तिने सांगितले की, सोशल मीडियाच्या आधी तिच्या आईला तिच्या विमान क्रॅश झाल्याची खोटी बातमी कळली होती. सोशल मीडियावरही तिच्या निधनाच्या खोट्या बातम्या पसरल्या होत्या. काजोल सध्या 'दो पत्ती' चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यात तिने पोलिसाची भूमिका केली आहे.

who is fahad ahmad swara bhaskar husband
10 / 30

स्वरा भास्करच्या पतीच्या उमेदवारीवरून शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक! कोण आहेत..

बॉलिवुड अभिनेत्री स्वरा भास्करच्या पती फहाद अहमद यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने अणुशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील कार्यकर्ते नाराज आहेत. फहाद अहमद हे समाजवादी पक्षातून राष्ट्रवादीत आले असून, त्यांची थेट लढत नवाब मलिक यांच्या मुलगी सना मलिक यांच्याशी होणार आहे. कार्यकर्त्यांनी 'आमच्या कुणाचीच पत्नी अभिनेत्री नसल्यामुळे आम्हाला उमेदवारीत टाळलं' अशी नाराजी व्यक्त केली आहे.

Vanchit Bahujan Aghadi
11 / 30

वंचितची आठवी यादी जाहीर; आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंविरोधात उमेदवार रिंगणात!

उमेदवारी अर्ज भरायला अवघे दोन दिवस उरलेले असल्याने सर्वच पक्षांकडून जागा वाटप जलद गतीने सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील वाद संपत नसल्याने त्यांचं जागा वाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. दरम्यान, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढणार असल्याने त्यांनीही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मनसेने सहावी यादी जाहीर केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने आठवी यादी जाहीर केली आहे.

Sujay Vikhe Patil Emotional Speeh
12 / 30

“सातत्याने मला संपवण्याचा प्रयत्न होतोय!” भरसभेत सुजय विखेंना अश्रू अनावर

संगमनेरमध्ये सुजय विखे पाटील आणि जयश्री थोरात यांच्यात वाद विकोपाला पोहोचले आहेत. जयश्री थोरात यांच्यावर झालेल्या अन्यायावर न्याय मागताना सुजय विखे पाटील यांनी आदिवासी महिलांनाही न्याय मिळावा अशी मागणी केली. भाषणादरम्यान त्यांनी मतदारांना आवाहन केले की, छोट्या आमिषांसाठी मुलांच्या भवितव्याशी तडजोड करू नका. सुजय विखे संपल्यास गोर-गरीबांचा आवाज आणि विकास संपेल, असेही त्यांनी सांगितले.

Surbhi Jyoti Sumit Suri got married
13 / 30

‘कबूल है’ फेम अभिनेत्रीने बॉयफ्रेंड निसर्गाच्या सानिध्यात बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

'नागिन' फेम टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योतीने तिचा बॉयफ्रेंड सुमित सुरीशी रविवारी (२७ ऑक्टोबर) उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील रिसॉर्टमध्ये साधेपणाने लग्न केलं. दोघेही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. सुरभीने लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुरभीने 'कबूल है', 'नागिन' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

Congress Candidates List
14 / 30

Congress Candidates List : काँग्रेसच्या नव्या यादीतून १४ उमेदवारांना संधी, अंधेरी पश्चिममधून उमेदवार जाहीर!

मविआतील जागावाटपाचा घोळ अद्यापही संपलेला नाही. नाना पटोले यांनी ८५-८५-८५ चा फॉर्म्युला जाहीर केला होता, तर बाळासाहेब थोरातांनी ९०-९०-९० चा फॉर्म्युला मांडला. मात्र, काँग्रेसने आतापर्यंत १०१ उमेदवार घोषित केले आहेत, ज्यामुळे समसमान फॉर्म्युल्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असल्याने काँग्रेसने १४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

Eknath Shinde Candidates List
15 / 30

शिंदेंच्या शिवसेनेतील दुसरी यादी जाहीर; आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरा मैदानात!

शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये मिलिंद देवरा, संजय निरुपम, निलेश राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे आशीर्वादाने ही यादी जाहीर करण्यात आली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Raj thackeray sixth List
16 / 30

मनसेची सहावी यादी जाहीर; मुंबई-ठाण्यातील महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहावी यादी जाहीर केली असून ३२ उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघातून जुईली शेंडे, कल्याण पश्चिममधून उल्हास भोईर आणि उल्हासनगरमधून भगवान भालेराव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. मनसेने आतापर्यंत ११० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

Ramdas Athawale
17 / 30

“महायुतीने आमचा विचार केला नाही”, रामदास आठवलेंनी व्यक्त केली नाराजी

महायुतीचं जागावाटप सुरू झालं असून बहुतेक जागांवर उमेदवार जाहीर झाले आहेत. रिपब्लिकन (आठवले गट) पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चार-पाच जागांची मागणी केली. त्यांनी धारावी किंवा चेंबूरच्या जागेवर आग्रह धरला आहे. रिपब्लिकन पक्षाकडे मोठं समर्थन असूनही महायुतीच्या नेत्यांनी त्यांचा विचार केला नसल्याचं आठवले म्हणाले.

Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
18 / 30

“आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून…”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने अनुशक्तीनगरमधून अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती फहाद अहमद यांना उमेदवारी दिल्याने वाद निर्माण झाला आहे. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इच्छूक उमेदवार निलेश भोसले यांनी फहाद अहमद यांच्यावर टीका केली. जयंत पाटील यांनी फहाद अहमद यांचे शिक्षण आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल.

platform ticket sales are temporarily restricted at major Mumbai stations
19 / 30

वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचा निर्णय; प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना!

मुंबईच्या वांद्रे स्थानकात अंत्योदय एक्स्प्रेस पकडताना झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जण जखमी झाले. दिवाळीच्या गर्दीमुळे मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे आणि नागपूर स्थानकांवर ८ नोव्हेंबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री बंद केली आहे. फक्त ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या आजारी प्रवाशांना सूट देण्यात आली आहे.

Aaditya Thackeray on His Marriage
20 / 30

“२०२९ मध्ये निवडणूक लढव, आधी लग्न कर”, आदित्य ठाकरेंवर लग्नासाठी घरातून दबाव?

राज्याचे युवा आमदार आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना सतत विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ते लग्न कधी करणार? इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मिश्किल उत्तर दिलं की, "हा प्रश्न माझ्या घरातून नाही ना आला?" आदित्य ठाकरेंची एकूण मालमत्ता २३ कोटी ४३ लाख रुपये असून, गेल्या ५ वर्षांत त्यांच्या संपत्तीत ६ कोटींची वाढ झाली आहे.

Stampede at Bandra Station
21 / 30

“स्पेशल ट्रेनला १६ तास उशीर, एक्स्प्रेस फलाटावर येताच…”, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम!

मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर चेंगराचेंगरी होऊन नऊ प्रवासी जखमी झाले. पहाटे ५ वाजता ही घटना घडली. अंत्योदय एक्स्प्रेसला नेहमीप्रमाणे गर्दी होती, परंतु एका स्पेशल ट्रेनच्या रद्द झाल्यामुळे अधिक गर्दी झाली. पोलिसांनी रांगा लावल्या होत्या, पण जागा मिळवण्यासाठी झुंबड उडाली. जखमींवर उपचार सुरू असून, दोन जणांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले.

Sharad Pawar and Fahad Ahmad
22 / 30

शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक! नवाब मलिकांच्या लेकीविरोधात लढणार स्वरा भास्करचा पती!

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने अनुशक्तीनगर येथून अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहद अहमद यांना उमेदवारी दिली आहे. फहद अहमद हे पूर्वी समाजवादी पार्टीत होते आणि त्यांनी आजच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. नवाब मलिक यांच्या लेक सना मलिक यांच्या विरोधात फहद अहमद उभे आहेत. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

Anil Deshmukh Said This Thing About Devendra Fadnavis
23 / 30

“टरबूजा मी पुन्हा येईन.. पुन्हा येईन असं…”; अनिल देशमुखांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी 'डायरी ऑफ ए होम मिनिस्टर' या त्यांच्या पुस्तकातील उतारे पोस्ट केले आहेत. देशमुखांनी फडणवीसांनी खोटे आरोप करण्यास सांगितल्याचा दावा केला आहे. तुरुंगातील अनुभवांवर आधारित त्यांनी फडणवीसांची तुलना गलेलठ्ठ उंदराशी केली आहे. त्यांच्या पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे आहेत.

Happy Vasubaras 2024 Wishes in Marathi| Happy Govatsa Dwadashi 2024 wishes in marathi
24 / 30

वसुबारसनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा; पाहा लिस्ट

दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी' हे गाणं तुमच्या अनेकांना आठवतं असेल. विशेषत: दिवाळी सणाच्या वेळी या गाण्याची अनेकांना आवठण होते. भारतात विविध पद्धतींनी दिवाळीची सुरुवात होते. मा,त्र महाराष्ट्रात वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात होते. यंदा सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी अश्विन कृष्ण एकादशीला गोवत्स द्वादशी, वसुबारस सण साजरा होणार आहे. वसुबारसच्या दिवशी गाई व वासरांची पूजा केली जाते. याच सणानिमित्त तुमच्या प्रियजनांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी तुम्ही त्यांना खास मराठीतून शुभेच्छा नक्की देऊ शकता.

Uddhav Thackeray on Dahisar vidhansabha
25 / 30

मोठी बातमी! ठाकरेंनी मुंबईत उमेदवार बदलला; दहिसरमध्ये तासाभरात नेमकं काय घडलं?

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने दहिसर विधानसभा मतदारसंघासाठी विनोद घोसाळकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आधी तेजस्वी घोसाळकर यांचे नाव घोषित झाले होते, परंतु नंतर विनोद घोसाळकर यांचे नाव जाहीर करण्यात आले. विनोद घोसाळकर हे २००९ साली या मतदारसंघाचे आमदार होते. भाजपाच्या मनीषा चौधरी यांच्या विरोधात ते निवडणूक लढवणार आहेत.

Congress List
26 / 30

काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; बाबा सिद्दिकींच्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून उमेदवार आणि जागा वाटप सुरू झाले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांनी स्वतंत्र उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने तिसरी यादी जाहीर केली असून यात १६ उमेदवारांची नावे आहेत. सचिन सावंत अंधेरी पश्चिममधून निवडणूक लढवणार आहेत.

Nawab Malik
27 / 30

“मी निवडणूक लढणारच…!”, नवाब मलिक ठाम; लेकीच्या शेजारच्या मतदारसंघातून रिंगणात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अनुशक्तीनगरमधून नवाब मलिक यांच्या मुलगी सना मलिक यांना तिकीट दिल्याने नवाब मलिक बंडखोरी करत मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी २९ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले. भाजपाने त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला असून, अजित पवार योग्य निर्णय घेतील असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Prithvik Pratap Prajakta Vaikul wedding unseen photos
28 / 30

पृथ्वीक प्रतापने शेअर केले लग्नातील Unseen Photos, कॅप्शनने वेधले लक्ष

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापने त्याची गर्लफ्रेंड प्राजक्ता वायकूळशी साधेपणाने निसर्गाच्या सानिध्यात लग्नगाठ बांधली. शुक्रवारी, २५ ऑक्टोबरला, मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. आता पृथ्वीकने लग्नातील काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.

Tejaswi Ghosalkar Nomination
29 / 30

मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी! फेसबूक लाईव्हदरम्यान हत्या झालेल्या नेत्याच्या पत्नीला उमेदवारी

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे दिवंगत नेते अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना दहिसर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना एबी फॉर्म दिला आहे. तसेच, हरुन खान (वर्सोवा), भैरुलाल चौधरी जैन (मलबार हिल) आणि संजय भालेराव (घाटकोपर पश्चिम) यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

Woman slaps Telugu actor NT Ramaswamy
30 / 30

…अन् महिलेने भर गर्दीत अभिनेत्याला केली मारहाण, चित्रपट ठरला कारणीभूत; व्हिडीओ व्हायरल

मनोरंजन October 27, 2024

तेलुगू अभिनेता एनटी रामास्वामी यांच्यावर हैदराबादमधील थिएटरमध्ये 'लव्ह रेड्डी' चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर एका महिलेने हल्ला केला. रामास्वामी यांनी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर महिलेने स्टेजवर जाऊन त्यांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. महिलेने चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेमुळे रागाच्या भरात हल्ला केल्याचे सांगितले.