“मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे असे..”, अमृता फडणवीस यांची पवारांवर टीका
नागपूरमध्ये अमृता फडणवीस यांनी भाषणात भाजपाला पुन्हा निवडून देण्याचं आवाहन केलं. त्यांनी लाडकी बहीण योजना हिट ठरल्याचं सांगितलं आणि शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. नागपूरचा विकास देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींमुळे झाल्याचं त्यांनी नमूद केलं. महिलांसाठी भाजपाने आणलेल्या विविध योजनांची माहिती दिली आणि मतदानाचं महत्त्व अधोरेखित केलं.