Nana Patole on congress
1 / 31

काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर सर्वांचा नाना पटोलेंवर रोख; अशोक चव्हाण म्हणाले…

काँग्रेसला लोकसभेत यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र मोठा पराभव सहन करावा लागला. महाराष्ट्रात केवळ १६ जागा जिंकता आल्या. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली. चव्हाण म्हणाले, "काँग्रेसने आत्मपरिक्षण करावे." नागपूरचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनीही नाना पटोले यांना पराभवाचे कारण ठरवले. काँग्रेसने १०१ मतदारसंघात उमेदवार उभे केले होते, पण फक्त १६ जागा जिंकल्या.

Swipe up for next shorts
Success story of kamal khushlani owner of mufti jeans once borrowed money now owning crores business
2 / 31

१०,००० रुपयांच्या कर्जाने सुरू केलं काम, आता कोटींचं साम्राज्य, वाचा कोणता व्यवसाय करतात..

Success story of Kamal Khushlani: कमल खुशलानी यांनी केवळ १०,००० रुपयांचे कर्ज घेऊन १,१५० कोटी रुपयांचे व्यवसायाचे साम्राज्य उभे केले आहे. त्यांचा ब्रँड मुफ्ती (MUFTI) हे आज भारतीय फॅशन जगतात एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांच्या मेहनत आणि स्वप्नांमुळे हे सगळं शक्य झाल्याचं या प्रवासातून कळतं. १९९८ मध्ये सुरू झालेला त्यांचा प्रवास बाईकवर कपडे विकण्यापासून करोडोंच्या व्यवसायापर्यंत गेला आहे. चला तर मग, कमल खुशलानी यांच्या यशाच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ या.

Swipe up for next shorts
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
3 / 31

“पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना म्हटले की, सरदार पटेल, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण यांना कधीही तडीपार केले गेले नव्हते. यावर भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर देत विचारले की, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटलजी, अडवाणीजी यांच्याबाबतही पवारांनी असेच वक्तव्य केले असते का? तसेच, दाऊदच्या हस्तकांना संरक्षण देणाऱ्या नेत्यांपेक्षा अमित शहांची तडीपारी देशभक्तीचे लक्षण आहे, असेही तावडे म्हणाले.

Swipe up for next shorts
bollywood actor sahil khan announces secon wife conversion to islam
4 / 31

बॉलीवूडच्या फ्लॉप हिरोच्या दुसऱ्या पत्नीने स्वीकारला इस्लाम धर्म

बॉलीवूडच्या दुनियेत अनेकांनी आपलं नशीब आजमाजवलं. यामधील काही जण सुपरहिट झाले. तर काहीजण फ्लॉप ठरले. त्यापैकी एक म्हणजे साहिल खान. ‘स्टाइल’ आणि ‘एक्सक्यूज मी’ यांसारख्या चित्रपटातून प्रसिद्ध झोतात आलेल्या साहिल खान एकेकाळी तरुणींना क्रश होता. पण काही काळानंतर तो गायबचं झाला. बॉलीवूडनंतर त्याने थेट व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं. फिटनेससंबंधित साहिलने स्वतःचा ब्रँड सुरू केला. गेल्यावर्षी साहिल खानने दुसरं लग्न केलं. या लग्नाला वर्ष पूर्ण होताच त्याच्या पत्तीने इस्लाम धर्म स्वीकारल्याचं समोर आलं आहे.

Walmik Karad Mother Parubai Karad
5 / 31

वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात वाल्मिक कराडवर मकोका गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्हा न्यायालयात त्याला हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणी परळीत आंदोलन झाले. वाल्मिक कराडची आई पारूबाई कराड यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले आणि मुलावर झालेला अन्याय थांबवण्याची मागणी केली. त्यांनी सर्व गुन्हे खोटे असल्याचे सांगितले आणि न्यायाची मागणी केली.

Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Evicted From Salman Khan Show
6 / 31

Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या चार दिवसाआधी मराठमोळी अभिनेत्री झाली एविक्ट

Bigg Boss 18: ‘बिग बॉस’चं १८वं पर्व आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. सध्या अंतिम आठवडा सुरू आहे. १९ जानेवारीला महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. अवघे चार दिवस महाअंतिम सोहळ्याला बाकी आहेत. पण त्यापूर्वी मिड वीक एविक्शन झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता ‘बिग बॉस’च्या १८च्या पर्वाचे टॉप-६ सदस्य भेटले आहेत.

premachi goshta 2
7 / 31

मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

दिग्दर्शक सतीश राजवाडे 'प्रेमाची गोष्ट २' हा चित्रपट घेऊन येत आहेत. यापूर्वी त्यांनी 'मुंबई-पुणे-मुंबई' मालिकेतून प्रेमाच्या विविध छटा दाखवल्या होत्या. 'प्रेमाची गोष्ट २' मध्ये व्हीएफएक्स आणि प्रेमकथेचे अनोखे मिश्रण आहे. हा चित्रपट जून २०२५ मध्ये प्रदर्शित होईल. निर्माते संजय छाब्रिया आणि सहनिर्माते अमित भानुशाली आहेत. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.

madhuri dixit car Ferrari 296 GTB price
8 / 31

Video: माधुरी दीक्षितने घेतली आलिशान गाडी, किंमत वाचून थक्क व्हाल

बॉलीवूड January 15, 2025

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी त्यांच्या कार कलेक्शनमध्ये नवीन फेरारी 296 GTS अॅड केली आहे. या कारची किंमत ६.२४ कोटी रुपये आहे. सोशल मीडियावर या कारचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. माधुरीच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-मेबॅक S560, रेंज रोव्हर वोग आणि पोर्श 911 टर्बो एस यांचा समावेश आहे. माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

cheapest electric car ligier mini ev could launch in 1 lakh rupees know features design battery details range
9 / 31

फक्त १ लाख रुपयात लॉंच होऊ शकते ‘ही’ इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जवर मिळेल १९२ किमीची रेंज

ऑटो January 14, 2025

देशात आता मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने लाँच होत आहेत. नवीन मॉडेल्स कार मार्केटमध्ये येत आहेत. तसंच भारतात अनेक इलेक्ट्रिक कार आहेत ज्या बजेट रेंजमध्ये उपलब्ध आहेत, तथापि आता सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Ligier Mini EV लवकरच देशात लॉंच केली जाऊ शकते. या इलेक्ट्रिक कारची किंमत फक्त १ लाख रुपये असू शकते असा दावा केला जात आहे. या कारच्या लॉंचनंतर या प्रकरणात किती तथ्य आहे हे समोर येईल, सध्या ग्राहक या इलेक्ट्रिक कारची वाट पाहत आहेत.

Madhuri dixit shared glowing skincare hack for dull dry skin in winters know expert advice
10 / 31

माधुरी दीक्षितने सांगितलं त्वचेचं रहस्य! ‘या’ रेसिपीने चेहरा दिसेल चमकदार

हेल्थ January 14, 2025

बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या DIY हॅक्स आणि रेसिपी फॉलो करणे सोपे आहे. चमकदार त्वचेसाठी अभिनेत्रीने नुकतीच एक खास रेसिपी सांगितली आहे. “जर तुम्ही संध्याकाळी बाहेर जाण्याचा विचार करीत असाल आणि तुमची त्वचा कोरडी वाटत असेल, तर तुम्हाला फक्त काकडीचे काही तुकडे आणि कच्चं दूध हवं आहे,” असं अभिनेत्रीनं आपल्या यूट्यूब चॅनेलवर सांगितलं.

ram kapoor praised rakhi sawant
11 / 31

राखी सावंतचा इंडस्ट्रीने गैरवापर करण्याचा प्रयत्न केला, अभिनेत्या दावा; म्हणाला…

'बडे अच्छे लगते है' फेम राम कपूरने राखी सावंतचं कौतुक केलं आहे. राखीने हिंदी चित्रपटसृष्टीत कोणताही गॉडफादर नसताना नाव कमावले, त्याबद्दल रामने तिच्या संघर्षाकडे लक्ष वेधलं. 'राखी का स्वयंवर'चा उल्लेख करताना रामने तिच्या स्वबळावर मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं. रामने तिच्या मतांशी सहमत नसला तरी तिचा आदर करतो. राम सध्या वजन घटवल्यामुळे चर्चेत आहे, त्याने ५५ किलो वजन कमी केलं आहे.

actor arun singh rana divorce
12 / 31

प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट, अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “४ वर्षे…”

टीव्ही अभिनेता अरुण सिंह राणा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने घटस्फोट झाल्याचे सांगितले. लग्न मोडल्यानंतर त्याने नैराश्याचा सामना केला, पण कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे खंबीर राहिला. आत्महत्येच्या विचारांवर मात करत, अरुणने कधीही हार न मानण्याचे महत्त्व सांगितले. २०२५ मध्ये करिअरवर लक्ष केंद्रित करण्याची त्याची योजना आहे. अरुणने 'महाभारत', 'दीया और बाती हम' आणि 'नागिन 6' मध्ये काम केले आहे.

Surya and Mangal make pratiyuti yog 2025
13 / 31

सूर्य-मंगळाच्या आशीर्वादाने १६ जानेवारीपासून ‘या’ राशींना मिळणार भरपूर यश अन् पैसा

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य हा एक तेजस्वी तारा आहे. त्याच्या राशिबदलाने प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या प्रभाव पडत असतो. दुसरीकडे ग्रहांचा सेनापती मंगळ हादेखील एक अतिशय महत्त्वाचा ग्रह मानला जातो. दोन्ही ग्रहांच्या स्थितीत होणारा बदल निश्चितच १२ राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार १६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजून ६ मिनिटांनी सूर्य आणि मंगळ एकमेकांपासून १८० अंशांवर असतील; ज्यामुळे प्रतियुती योग तयार होत आहे.

Huppa Huiyya 2 announcement
14 / 31

ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा

२०१० मध्ये आलेल्या 'हुप्पा हुय्या’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समित कक्कड यांनी 'हुप्पा हुय्या २' ची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर केली आहे. पहिल्या भागातील दमदार कथा आणि व्हीएफएक्सने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. 'हुप्पा हुय्या २' पूर्वीपेक्षा भव्यदिव्य व स्टायलिश ट्रीटमेंटने सज्ज होणार आहे. चित्रपटाच्या लेखनाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच कलाकारांची नावे जाहीर होणार आहेत.

Pooja Sawant First Makar Sankranti Celebration
15 / 31

Video: पूजा चव्हाणने ऑस्ट्रेलियात साजरी केली पहिली मकर संक्रात; सासूबाईंची कमेंट चर्चेत

मराठी अभिनेत्री पूजा सावंतने लग्नानंतरची पहिली मकर संक्रात ऑस्ट्रेलियात साजरी केली. तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून सेलिब्रेशनची झलक दाखवली. पूजाचे कुटुंबीय आणि पती सिद्धेश चव्हाण यांच्यासोबत तिने पारंपरिक पोशाखात संक्रांत साजरी केली. पूजाची आई तिला ओवाळते आणि सिद्धेश आशीर्वाद घेतो. व्हिडीओत पूजाची बहीण रुचिरादेखील दिसते. पूजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

aadar jain alekha advani wedding videos
16 / 31

Video:बॉलीवूड अभिनेत्याने एक्स गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीशी केलं लग्न, गोव्यात पार पडला सोहळा

बॉलीवूड January 14, 2025

अभिनेता आदर जैन आणि गर्लफ्रेंड अलेखा अडवाणी यांनी गोव्यात १२ जानेवारी २०२५ रोजी लग्न केलं. या सोहळ्याला नीतू कपूरसह अनेकांनी हजेरी लावली होती. आदरने ग्रे सूट तर अलेखाने पांढरा गाऊन परिधान केला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आदरने तारा सुतारियाबरोबर ब्रेकअपनंतर अलेखासोबत नातं अधिकृत केलं आणि लग्नासाठी प्रपोज केलं.

When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
17 / 31

“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन

बॉलीवूड January 14, 2025

शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय हे बॉलीवूडमधील दिग्गज कलाकार असून त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र, २००० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांचे व्यावसायिक आणि वैयक्तिक संबंध बिघडले. ऐश्वर्याने सांगितले की तिला शाहरुखच्या पाच चित्रपटांमधून काढण्यात आले होते. शाहरुखने माफी मागितली तरी वाद वाढला. जया बच्चन यांनीही शाहरुखच्या टिप्पण्यांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. २००७ मध्ये शाहरुख ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नात हजर नव्हता.

Abdul Sattar
18 / 31

अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”

माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जालना येथे निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, हे भविष्यासाठी घातक असल्याचे सांगत विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातून वगळल्यामुळे ते नाराज आहेत. सत्तार यांनी सांगितले की, जातीयवादामुळे माणुसकी हरवते आणि राजकारणात कुणीही कुणावर विश्वास ठेवणार नाही अशी स्थिती निर्माण होते असंही ते म्हणाले.

Success story of kalpana saroj who got married at 12 now owning crores business
19 / 31

बाराव्या वर्षात लग्न अन् सासरच्यांचा छळ! हार न मानता ‘या’ महिलेने उभारलं कोटींचं साम्राज्य

करिअर January 14, 2025

Success Story of Kalpana Saroj: मोठी स्वप्ने पाहिल्यावर ती प्रत्यक्षात आणण्याचे धाडस मिळते असे म्हणतात. जर आपण आपल्या जीवनात कोणतेही ध्येय ठेवले तर आपल्याला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते, परंतु ही आव्हाने आपल्याला आणखी मजबूत बनवतात. याचे सर्वात परिपूर्ण उदाहरण म्हणजे कल्पना सरोज, ज्यांनी अनेक अडचणींचा सामना करूनही यश संपादन केले आणि आता त्यांची गणना देशातील सर्वात यशस्वी व्यावसायिक महिलांमध्ये केली जाते. चला तर मग जाणून घेऊया कल्पना सरोज यांच्याबद्दल…

Santosh Deshmukh
20 / 31

संतोष देशमुख हत्याप्रकरणी ग्रामस्थांचा सरकारला अल्टिमेटम; म्हणाले…

संतोष देशमुख हत्याप्रकरणाला महिना उलटूनही त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. वाल्मिक कराडविरोधात मकोका लावण्यात आलेला नाही आणि एक आरोपी फरार आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आंदोलन केले होते, परंतु ते तात्पुरते स्थगित केले आहे. धनंजय देशमुखांना धमक्या मिळत असून, त्यांनी पोलीस तपासावर नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांनीही तीव्र आंदोलन केले आहे.

mrunal thakur marathi film sangeet manapman review
21 / 31

मृणाल ठाकूरने पाहिला मराठी सिनेमा ‘संगीत मानापमान’, पोस्ट करत म्हणाली…

वैदेही परशुरामी, सुमित राघवन आणि सुबोध भावे यांच्या 'संगीत मानापमान' चित्रपटाचे १० जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शन झाले. मराठमोळी बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने या चित्रपटाचे कौतुक केले आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटातील गाण्यांचे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. सुबोध भावे दिग्दर्शित या चित्रपटात अनेक प्रमुख कलाकार आहेत आणि पटकथा शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांनी लिहिली आहे.

Ashwini Deshmukh
22 / 31

“संतोष देशमुखांना भीती वाटत होती, गुंड प्रवृत्तीचे…”, हत्येच्या दोन दिवस आधी काय घडलं?

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्की प्रकरणातून हत्या झाली. महिनाभरानंतरही एक आरोपी फरार असून वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला नाही. या मागण्यांसाठी बीडमधील नागरिकांनी आंदोलन केले. संतोष देशमुख यांना धमक्या येत होत्या, असे त्यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांनी सांगितले. संतोष देशमुख भीतीमुळे लातूरला थांबले होते, पण अखेर गावी परतले आणि त्यांची हत्या झाली.

Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
23 / 31

महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर जुळून आला अद्भुत योग; ‘या’ ३ राशींचे नशीब चमकणार

Mahakumbh 2025 GrahYog : पौष पौर्णिमेपासून म्हणजेच १३ जानेवारी २०२५ पासून महाकुंभ मेळा सुरू होणार आहे. या महान उत्सवात देशासह जगभरातील साधूसंत, भाविक आणि अघोरी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी येतात. जर तुम्ही ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवत असाल तर या १४४ वर्षांनंतर महाकुंभमेळाच्या मुहूर्तावर एक अद्भुत योग निर्माण होत आहे. ज्यामुळे काही राशींवर शुभ परिणाम होण्याची शक्यता आहे.

arjun rampal grandfather designed first artillery gun for Indian Army
24 / 31

‘या’ बॉलीवूड अभिनेत्याच्या आजोबांनी भारतीय सैन्यासाठी डिझाइन केली होती पहिली तोफ

बॉलीवूड January 13, 2025

अर्जुन रामपाल, ज्याचा सिनेसृष्टीशी काहीच संबंध नव्हता, सैन्याच्या पार्श्वभूमीतून आला. त्याचे आजोबा ब्रिगेडियर गुरदयाल सिंग यांनी भारतीय सैन्यासाठी पहिली तोफ डिझाईन केली होती. मॉडेलिंगमध्ये यश मिळाल्यानंतर अर्जुनने अभिनयात पदार्पण केले. सुरुवातीचे १४ चित्रपट फ्लॉप झाले, पण 'रॉक ऑन'साठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'डॉन' चित्रपटानंतर त्याचे नशीब पालटले. सध्या तो आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

Masaba Gupta baby girl name is Matara
25 / 31

३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…

बॉलीवूड January 13, 2025

ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक मसाबा गुप्ता तीन महिन्यांपूर्वी आई झाली. मसाबा व तिचा पती सत्यदीप मिश्रा यांनी ११ ऑक्टोबर २०२४ रोजी मुलीला जन्म दिला. मसाबाने मुलीचं नाव 'मतारा' ठेवलं असून, त्याचा अर्थ नऊ हिंदू देवींच्या दैवी स्त्री शक्तींचे प्रतीक आहे. मसाबाने इन्स्टाग्रामवर मताराच्या नावाचं ब्रेसलेट घातलेला फोटो पोस्ट केला आहे.

Supriya Sule
26 / 31

वडिलांवर घणाघाती टीका झाल्यानंतरही सुप्रिया सुळेंची संयमी प्रतिक्रिया, म्हणाल्या…

शिर्डी येथे भाजपाच्या अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यांच्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी संयमी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, अमित शाहांनी परभणी आणि बीड प्रकरणावरही बोलायला हवे होते. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका करून हेडलाईन मिळवण्याऐवजी, त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख कुटुंबीयांबद्दलही बोलावे, असे सुळे म्हणाल्या.

Happy Makar Sankranti 2025 Wishes Messages in Marathi
27 / 31

मकर संक्रांतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा मराठीतून शुभेच्छा

हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे विशेष असे महत्त्व आहे; पण वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा मकर संक्रांत सण अधिक खास मानला जातो. या दिवशी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो आणि त्यामुळे या सणाला मकर संक्रांत, असे म्हणतात. या सणाच्या निमित्ताने पतंग उडवण्याचा आनंद घेतला जातो, तिळगुळाचे लाडू वाटून एकमेकांना गोड शुभेच्छा दिल्या जातात. यंदा १४ जानेवारी रोजी मंकर संक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने तुम्ही प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook च्या माध्यमातून शुभेच्छा अन् शुभेच्छापत्र पाठवू शकता.

Kolkata is India’s most congested city in 2024
28 / 31

सर्वाधिक गर्दीच्या शहरांच्या यादीत पुणे तिसऱ्या स्थानावर; मुंबईचं स्थान कितवं?

टॉमटॉमच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये भारतातील सर्वाधिक गर्दीचं शहर कोलकाता ठरलं आहे. कोलकात्यानंतर बंगळुरू आणि पुण्याचा क्रमांक लागतो. २०२३ मध्ये बंगळुरू सर्वाधिक गर्दीचं शहर होतं, पण २०२४ मध्ये कोलकाताने बाजी मारली. कोलकात्यात १० किमी अंतर कापण्यासाठी ३४ मिनिटे लागतात. जागतिक स्तरावर कोलकाता दुसऱ्या, बंगळुरू तिसऱ्या आणि पुणे चौथ्या क्रमांकावर आहेत. इतर गर्दीची शहरे हैदराबाद, चेन्नई, मुंबई, अहमदाबाद, एर्नाकुलम आणि जयपूर आहेत.

Madhuri Dixit Gauri Khan buy OYO shares
29 / 31

माधुरी दीक्षित व गौरी खानने केली शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, कोणत्या कंपनीचे शेअर्स घेतले?

बॉलीवूड January 13, 2025

अलीकडच्या काळात बॉलीवूड सेलिब्रिटी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. विराट कोहली व अनुष्का शर्मा यांच्यानंतर माधुरी दीक्षित, अमृता राव आणि गौरी खान यांनी ओयोचे शेअर्स खरेदी केले आहेत. गौरी खानने ऑगस्ट २०२४ मध्ये २.४ मिलियन शेअर्स खरेदी केले. माधुरी दीक्षित व तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी दोन मिलियन शेअर्स घेतले आहेत. अमृता राव व तिचा पती आरजे अनमोल सूद यांनीही गुंतवणूक केली आहे.

Torres Scam
30 / 31

Torres Scam : टोरेस कंपनीचा सीईओ दहावी नापास, सीईओ दिसण्याकरता घालायचा फॉर्मल कपडे

टोरेस स्कॅममध्ये दोन युक्रेनिअन नागरिकांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. व्हिक्टोरिया कोवालेन्को आणि ओलेना स्टॉईन हे दोघे देशातून पळून गेले. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यासंदर्भात तपास केला. या प्रकरणात तानिया कासाटोवा आणि व्हॅलेंटिनो गणेश कुमार यांना अटक करण्यात आली. रियाझ दहावी नापास असून, त्याला कंपनीचा सीईओ बनवण्यात आले होते. पोलिसांनी ५.७७ कोटी रुपये जप्त केले आहेत.

aamir khan kiran rao
31 / 31

“त्याची आई अजूनही…”, किरण राव एक्स पती आमिरच्या मुलांची नावं घेत म्हणाली…

बॉलीवूड January 13, 2025

आमिर खान व किरण राव २०२१ मध्ये विभक्त झाले. १६ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. किरणने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांनी विचारपूर्वक निर्णय घेतला आणि आझादवर त्याचे भावनिक परिणाम होणार नाही याची काळजी घेतली. घटस्फोटानंतरही त्यांच्यात प्रेम व आदर कायम आहे. किरणने नमूद केले की, आमिर तिचा मित्र व सपोर्ट सिस्टीम आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी अजूनही तिचे चांगले संबंध आहेत.