Sandeep Naik Joined Sharad Pawar NCP
1 / 30

“शब्द फिरवला गेला, माझी कोंडी झाली”, तुतारी फुंकताच संदीप नाईकांचे भाजपावर टीकास्र

ठाणे जिल्ह्यातील बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपा नेते गणेश नाईक यांचे पुत्र आणि नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी भाजपा सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. नवी मुंबईच्या विकासासाठी दिलेला शब्द पाळला गेला नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. २०१९ च्या निवडणुकीत नाईक कुटुंबीयांनी भाजपात प्रवेश केला होता, परंतु संदीप नाईक यांना तिकीट नाकारले गेले होते.

Swipe up for next shorts
Bollywood actor salman khan Dance On Kombadi Palali Song sung by Vaishali made old video viral softnews
2 / 30

‘कोंबडी पळाली’ गाण्यावर सलमान खानचा जबरदस्त डान्स पाहिलात का? जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

Salman Khan Dance On Kombadi Palali Song : बॉलीवूडचा भाईजान सध्या खूप चर्चेत आहे. एकीकडे ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वामुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणामुळे चर्चेत आहे. अशातच सलमान खानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे; ज्यामध्ये तो ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

Swipe up for next shorts
chia seeds health benefits soaked chia seeds benefits and direction to use
3 / 30

रोज चिया सीड्स खाण्याचे हे आहेत आरोग्य फायदे, वाचा कशाप्रकारे करावे सेवन

चिया सीड्स मानवी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत आणि या बियांचे नियमित सेवन करण्याची शिफारस आरोग्य तज्ज्ञ करतात. या बियांपासून जास्तीत जास्त आरोग्य लाभ मिळविण्यासाठी, त्या बिया खाण्यापूर्वी काही तास भिजवत ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही या बिया पाण्यात किंवा दुधातदेखील भिजवू शकता.

Swipe up for next shorts
lakhat ek amcha dada fame nitish Chavan dance in 100 episode completed celebration
4 / 30

‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने केला भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

Lakhat Ek Amcha Dada Serial : अभिनेता नितीश चव्हाण आणि अभिनेता दिशा परदेशी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका ८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेतील चार बहिणी आणि एक भावाची कथा प्रेक्षकांच्या अल्पावधीत पसंतीस पडली आहे. त्यामुळे ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतेच या मालिकेचे १०० भाग यशस्वीरित्या पूर्ण झाले. यानिमित्ताने सेटवर कलाकारांनी जल्लोष केला. या जल्लोषातील एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Sachin Waze on bail
5 / 30

मोठी बातमी! बडतर्फ अधिकारी सचिन वाझे यांना जामीन मंजूर, हायकोर्टाकडून दिलासा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोन वर्षांपासून तुरूंगात असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन मंजूर झाला आहे. देशमुख यांच्यासह अन्य आरोपी जामिनावर बाहेर आहेत, त्यामुळे वाझे यांनीही जामिनासाठी याचिका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने वाझे यांना जामीन मंजूर केला आहे.

Bhaubeej 2024 Gift Ideas for Brothers and Sisters in Marathi
6 / 30

यंदा तुमच्या बजेटनुसार द्या भावांना गिफ्ट! स्वस्तापासून महागड्यापर्यंत, पाहा हटके भेटवस्तू

यंदा तुम्ही तुमच्या भावाला काय गिफ्ट देणार आहात? काही हटके भेटवस्तूंचे पर्याय जाणून घ्या.

Gurupushyamrut yog
7 / 30

गुरुपुष्यामृताचा शुभ योग साधण्यासाठी उमेदवारांची धडपड, मुहुर्तावर कोण-कोण अर्ज भरणार?

विधानसभा निवडणुकीसाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे, परंतु महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसल्याने अर्ज प्रक्रियाही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. २४ ऑक्टोबरला गुरुपुष्यामृत योग असल्याने उमेदवार अर्ज भरण्याचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शिवसेनेचे राजन साळवी आणि भाजपाचे हेमंत रासने यांच्यासह अनेक उमेदवार या दिवशी अर्ज भरणार आहेत.

when Salman Khan denied killing blackbuck
8 / 30

काळवीटाची शिकार दुसऱ्याने केली, आरोप सलमान खानवर? अभिनेत्याचा जुना व्हिडीओ चर्चेत

सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. १९९८ मध्ये काळवीट शिकार प्रकरणात त्याला अटक झाली होती. २०१६ मध्ये निर्दोष मुक्तता, २०१८ मध्ये दोषी ठरवून जामिनावर सुटका झाली. बिश्नोई समाज काळवीट पवित्र मानतो, त्यामुळे सलमानला धमक्या येत आहेत. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानची सुरक्षा वाढवली आहे. सध्या तो बिग बॉस १८ होस्ट करत असून 'सिंघम अगेन' आणि 'सिकंदर' चित्रपटात काम करत आहे.

Abhishek Bachchan Video viral amid divorce rumours
9 / 30

Video: ऐश्वर्या रायशी घटस्फोटाची चर्चा, अभिषेक बच्चन कॅमेऱ्यासमोर हात जोडत म्हणाला…

अभिनेता अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांच्या नात्यात तणाव असल्याच्या चर्चा आहेत. अभिषेकचं एका बॉलीवूड अभिनेत्रीशी अफेअर असल्यामुळे हे घडल्याचं म्हटलं जातंय. मुंबई विमानतळावर पापाराझींनी त्याचा पाठलाग केला असता, अभिषेकने हात जोडून "बस भैया, थँक्यू" असं म्हटलं. अभिषेक सध्या 'हाऊसफुल 5' आणि शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटात काम करत आहे.

Udhaynidhi Stalin over Tamil Language
10 / 30

“मुलांची नावं तमिळच ठेवा, हिंदी लादून घेऊ नका”, तमिळनाडूच्या उपमुख्यमंत्र्यांचं आवाहन

तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी नवदाम्प्त्यांना आपल्या मुलांची नावे तमिळ भाषेत ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी हिंदी भाषा तमिळवर लादू नका असा इशारा दिला आहे. स्टॅलिन यांनी केंद्र सरकारवर टीका करताना नव्या शैक्षणिक धोरणातून हिंदी लादण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले. तमिळनाडू कधीच हिंदी भाषा स्वीकारणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Yogi Slogan in Mumbai
11 / 30

“बटेंगे तो कटेंगे”, मुंबईत योगींच्या घोषवाक्यांचे पोस्टर्स; भाजपाची नेमकी योजना काय?

मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांच्या "बटेंगे तो कटेंगे" घोषवाक्याचे पोस्टर लागले आहेत. भाजप समर्थक विश्वबंधू राय यांनी हे पोस्टर लावले असून, विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी हे घोषवाक्य वापरले जात आहे. हरियाणातील निवडणुकीत याचा यशस्वी वापर झाल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.

Surbhi Jyoti Marrying Boyfriend Sumit Suri
12 / 30

सुरभी ज्योती उत्तराखंडमधील नॅशनल पार्कमध्ये बांधणार लग्नगाठ, तारीख आली समोर

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती तिचा बॉयफ्रेंड सुमित सुरीशी २७ ऑक्टोबरला उत्तराखंडमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे. सुरभी व सुमित २०१८ पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. सुरभीने 'नागिन', 'कबूल है' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. सुरभीचे नाव यापूर्वी अभिनेता पर्ल पुरी व रित्विक धजनानीशी जोडले गेले होते, पण ती व रित्विक फक्त चांगले मित्र आहेत.

the late actress ashwini ekbote daughter in law amruta bane shares emotional post on death anniversary
13 / 30

“प्रिय आशुआई…”, अश्विनी एकबोटेंच्या पुण्यतिथी निमित्ताने सूनबाईची भावुक पोस्ट, म्हणाली…

नाटक, मालिका, चित्रपट या तीनही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या भरतनाट्यम् नृत्यांगणा अश्विनी एकबोटे यांचं २२ ऑक्टोबर २०१६ रोजी निधन झालं. पुण्यातील भरत नाट्य मंदिर येथे ‘नाट्य त्रिविधा’ या कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना तिहाई घेतल्यावर अश्विनी एकबोटे रंगमंचावर कोसळल्या. हृदयविकारच्या झटक्याने त्यांचं वयाच्या ४४व्या वर्षी निधन झालं. आज पुण्यतिथीनिमित्ताने अश्विनी एकबोटे यांची सून, अभिनेत्री अमृता बने हिने सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली आहे.

Marathi Actor Ajinkya Deo presented a poem in memory of his father Ramesh Deo watch Video
14 / 30

“बाबांच्या मनात…”, अजिंक्य देव यांनी वडील रमेश देव यांच्या आठवणीत सादर केली सुंदर कविता

मराठी सिनेसृष्टीत ‘हँडसम हंक’ म्हणून ओळखले जाणारे अजिंक्य देव सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल पोस्ट शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी वडील रमेश देव यांच्या आठवणीत सुंदर कविता सादर केली; ज्याचा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे.

akshay kumar
15 / 30

१३५ चित्रपट करणाऱ्या अक्षय कुमारचा अभिनेत्रीने राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केलेला अपमान

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार मागील काही काळापासून त्याच्या फ्लॉप चित्रपटांमुळे चर्चेत आहे. २०२४ मध्ये आलेले 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'सरफिरा' आणि 'खेल खेल में' हे तिन्ही चित्रपट फ्लॉप झाले. अक्षयने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले असून त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात झालेल्या अपमानाबद्दल बोलतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

BMC immediate action for cleaning garbage after Shashank Ketkar complaint
16 / 30

शशांक केतकरच्या तक्रारीनंतर BMCची तात्काळ कारवाई, व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने मानले आभार

अभिनेता शशांक केतकरने अलीकडेच मालाड येथील मालवणीमधील अस्वच्छतेबाबत मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार केली होती. एका व्हिडीओच्या माध्यमातून शशांकने ही तक्रार केली होती. ज्यावर मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेने तात्काळ कारवाई केली आहे. याचा व्हिडीओ शशांकने सोशल मीडियावर शेअर करत मुंबई महानगरपालिकेचे आभार मानले आहेत. त्यामुळेच सध्या नेटकरी शशांकचं कौतुक करत आहेत.

nikki tamboli on varsha usgaonkar
17 / 30

निक्की तांबोळी वर्षा उसगांवकरांबद्दल म्हणाली, “मी स्पष्टीकरण देण्यासाठी जन्मलेले नाही”

निक्की तांबोळी बिग बॉस मराठी ५ मध्ये चर्चेत राहिली. शो संपल्यानंतर तिने घरातील अनुभव, स्पर्धकांशी भांडणं आणि अरबाजबरोबर जवळीक याबाबत मतं मांडली. तिला वर्षा उसगांवकरांशी उद्धटपणे बोलल्याची खंत आहे, पण तिने माफी मागितली. निक्कीने स्पष्ट केलं की तिला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. वर्षाताईंना प्रेरणादायी मानून तिने त्यांना फॉलोबॅक केलं.

sairaj kendre dance with Vedanti Bhosale on kaali bindi song
18 / 30

“काळी बिंदी…”, साईराज केंद्रे आणि वेदांती भोसलेचा जबदरस्त डान्स, पाहा व्हिडीओ

'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यावर केलेला डान्स आणि गोड हावभावाने साईराज केंद्रेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. साईराजच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. सध्या साईराज 'झी मराठी' वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेतून आपल्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अशातच साईराजने 'ड्रामा ज्युनियर्स' फेम वेदांती भोसलेबरोबर केलेल्या जबरदस्त डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Anup Jalota says salman khan should apologize bishnoi community
19 / 30

“काळवीटाची शिकार केली नसेल तरी बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन…”, सलमान खानला कोणी दिला सल्ला?

बॉलीवूड अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्याच्या मित्र बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. भजन सम्राट अनुप जलोटा यांनी सलमानला बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की, सलमानने काळवीटाची शिकार केली असो वा नसो, माफी मागून वाद मिटवावा आणि सुरक्षित आयुष्य जगावे.

Diwali Lakshmi Pujan 2024 Shubh Muhurat in Marathi
20 / 30

३१ ऑक्टोबर की १ नोव्हेंबर? जाणून घ्या, लक्ष्मीपूजनाची योग्य तारीख अन् मुहूर्त

यंदा लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी आहे आणि कोणत्या वेळी करावे, याविषयी लोकांच्या मनात संभ्रम आहे. याविषयी लोकसत्ताने पंचागकर्ते पं. गौरव देशपांडे यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली.

Line of Actual Control china and INdia
21 / 30

LAC बाबत भारत आणि चीनमध्ये महत्त्वाचा करार, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती!

भारत आणि चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत नवीन करार झाला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले की, गेल्या काही आठवड्यांपासून राजनैतिक आणि लष्करी स्तरावर चर्चा सुरू आहे. २०२० मध्ये उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी गस्तीची व्यवस्था करण्यात आली आहे. देपसांग आणि डेमचोक भागातील गस्त व्यवस्थेशी संबंधित हा करार आहे. भारत-चीन संबंधांना जागतिक आणि धोरणात्मक महत्त्व आहे.

Adar Poonawalla Net Worth Car Collection House Property in Marathi
22 / 30

अदर पूनावाला एकूण किती संपत्तीचे आहेत मालक?

अदर पूनावाला यांनी पुण्यातून शालेय शिक्षण घेतल्यानंतर लंडनमध्ये बायोटेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं. २०११ मध्ये सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनल्यानंतर त्यांनी विकसनशील देशांसाठी परवडणारी लस तयार केली. करोना काळात त्यांनी प्रभावी लस तयार करून १७० पेक्षा जास्त देशांना पुरवली. त्यांच्या कुटुंबीयांचं नेटवर्थ १३६ कोटी रुपये आहे. त्यांनी विल्लू पूनावाला चॅरिटेबल फाऊंडेशन स्थापन करून सामाजिक उपक्रम हाती घेतले.

Raj Thackeray
23 / 30

राज ठाकरेंकडून पहिली यादी जाहीर, राजू पाटील यांंच्यासह ‘या’ शिलेदाराच्या नावाची घोषणा!

राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी घोषित केली. मनसेने यावेळी महायुतीपासून वेगळी भूमिका घेतली आहे. राजू पाटील यांना कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुभाष भोईर आणि शिवसेना शिंदे गटाचे राजेश मोरे यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे.

supreme court judge sanjay karol pic
24 / 30

“आपण अशा भारतात..”, सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी स्वत: काढलेला फोटो दाखवत…

महिला सशक्तीकरण आणि हक्कांच्या रक्षणावर भारतात वारंवार चर्चा होते, परंतु अनेक महिलांची स्थिती अजूनही सुधारलेली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय करोल यांनी अधोरेखित केले. त्यांनी एका भाषणादरम्यान २०२३ साली काढलेला फोटो दाखवून बिहार व त्रिपुराच्या दुर्गम भागातील महिलांच्या स्थितीवर भाष्य केले. न्यायमूर्ती करोल यांनी सामाजिक न्याय आणि महिलांच्या अधिकारांच्या बाबतीत न्यायालयाच्या ठाम भूमिकेचे उदाहरण दिले आणि दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज व्यक्त केली.

Bigg Boss 18 Chahat Pandey Proposed marriage to salman khan
25 / 30

चाहत पांडेने सलमान खानला घातली लग्नाची मागणी, भाईजान म्हणाला, “तुझ्या आईचं आणि…”

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात नुकताच झालेला वीकेंड वार खूपच जबरदस्त होता. सलमान खानने घरातल्या काही सदस्यांची जेवढी शाळा घेतली तेवढंच हसवलं. शनिवारी ( १९ ऑक्टोबर ) सलमान खानने अरफीन खानला खूप झापलं. अरफीनच्या प्रोफेशनवर अविनाश मिश्राने भाष्य केलं होतं. त्यानंतर अरफीन आणि त्याची पत्नी सारा खान सतत नाराजी व्यक्त करत होते. यावरून सलमानने अरफीनची कानउघडणी केली. यावेळी सलमानने साराबरोबर अजिबात बातचित केली नाही. पण रविवारी, साराबरोबर हसताना, विनोद करताना दिसला. यावेळी चाहत पांडेने थेट भाईजानला लग्नाची मागणीच घातली.

boyfriend died by heart attack
26 / 30

“तिला वाचवा, ती मरेल”, एवढं बोलून प्रियकर कोसळला; रक्ताच्या थारोळ्यात प्रेयसीला पाहून…

दिल्लीतील जगतपुरी भागात एका प्रियकराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रेयसीने आत्महत्येचा प्रयत्न करतानाचा व्हिडीओ प्रियकर अर्जुनला पाठवला. अर्जुन तिला रुग्णालयात पोहोचवताना स्वतःच हृदयविकाराच्या झटक्याने कोसळला. प्रेयसीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती सुधारत आहे. अर्जुनचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

drinking water with food cause gas or indigestion Know from experts
27 / 30

अन्नाबरोबर पाणी प्यायल्याने गॅस किंवा अपचन होऊ शकते का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

हेल्थ October 21, 2024

पचनाच्या आरोग्याचा विचार केला तर अनेक समज आणि गैरसमज अनेकांच्या मनात असतात. एक सामान्य समज असा आहे की, अन्नाबरोबर किंवा नंतर पाणी प्यायल्याने पोटातील अ‍ॅसिड्स पातळ होऊ शकतात, ज्यामुळे ते अन्न बारीक करण्यास कमी परिणामकारक बनतात, ज्यामुळे पचनशक्ती बिघडते आणि ब्लोटिंग आणि गॅससारख्या इतर समस्या उद्भवतात.

Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis?
28 / 30

उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची भेट? विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एक महिनाही उरलेला नाही. अशातच काँग्रेसच्या सूत्रांकडून बातमी आली की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे, तसेच संजय राऊत यांनी अमित शाह यांना फोन केला. मात्र, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ही बातमी खोटी असल्याचे सांगितले. त्यांनी महाविकास आघाडी एकत्र असल्याचे स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीनेही फडणवीस-ठाकरे भेटीचा दावा केला, मात्र विजय वडेट्टीवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

Meet Ranbir Kapoor Sister Riddhima Kapoor Husband owns a Rs 252 crore company
29 / 30

रिद्धिमा कपूरचा पती आहे तरी कोण? २५२ कोटींची सांभाळतो कंपनी

गेल्या आठवड्यात 'फॅबुलस लाइव्स ऑफ बॉलीवूड वाइव्स'चं तिसरं पर्व ( Fabulous Lives of Bollywood Wives Season 3 ) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालं. यामध्ये नीलम कोठारी सोनी, महीप कपूर, भावना पांडे, सीमा सजदेह यांच्यासह रणबीर कपूरची सख्खी बहीण रिद्धिमा कपूर साहनी झळकली आहे. 'फॅबुलस लाइव्स ऑफ बॉलीवूड वाइव्स'च्या माध्यमातून रिद्धिमाने वयाच्या ४४व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्यामुळे सध्या रणबीर कपूरची बहीण खूप चर्चेत आहे. पण, रिद्धिमा काय काम करते? तिचा पती कोण आहे? जाणून घ्या...

Salman Khan on Bigg Boss 18 shooting amid death threats
30 / 30

बिश्नोई गँगकडून धमक्या अन् बिग बॉस १८चे शूटिंग; सलमान खान स्पष्टच म्हणाला, “कसम खुदा की…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या खुनानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान आणि सिद्दिकी जवळचे मित्र होते. या परिस्थितीतही सलमानने बिग बॉस १८ चे शूटिंग केले. 'वीकेंड का वार'मध्ये सलमानने स्पर्धकांचा समाचार घेतला. चाहत पांडेने सलमानला लग्नासाठी प्रपोज केले, ज्यावर सलमानने हसून उत्तर दिले. सेटवर ६० हून अधिक सुरक्षा कर्मचारी होते.